जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धसाठी गणराज क्लब सज्ज…

Spread the love

रत्नागिरी- रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धा २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलांच्य बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आले आहेत.

या स्पर्धेत जिल्हाभरातून सुमारे ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धसाठी सहभागी होणारे गणराज क्लबचे खेळाडू पुढीलप्रमाणे-

निरज मकवाना, तुषात विलणकर, स्पर्श रेडीज
युबना संदे, तिर्था मकवाना, र्दवा हातिसकर, आहेर मुकादम, बरखा संदे, आदित्य मोरे, विहान शेटये,ओम झगडे, मंथन कोतवडेकर, रुद्र जाधव, अखिलेष वांयगणकर, त्रिशा मयेकर, आध्या कवितके, सोनाक्षी यादव, गौरी विलणकर, समर्थ विचारे, स्वानंद तुपे या खेळाडूनी सहभाग घेतला आहे. त्यांना यशस्वी वाटचालीसाठी या खेळाडूंना शुभेच्छा देताना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारगजे महासचिव मिलिंद पठारे उपाध्यक्ष प्रवीण बोरसे  खजिनदार व्यंकटेशराव कररा रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, शाहरुख शेख, मिलिंद भागवत, क्लबचे उपाध्यक्ष अभिजित विलणकर, सचिव रंजना मोडूळा, कोषाध्यक्ष नेहा किर, सदस्य साक्षी मयेकर, पुजा कवितके, यशंवत शेलार, कनिष्का शेलार यांनी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रमुख तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, महिला प्रशिक्षक सौ. आराध्या मकवाना  यांचे मार्गदर्शन लाभत  आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page