आपले हक्क, अधिकार,नवीन योजना, बदलणारे नवीन कायदे, समजावून घ्या , ॲडव्होकेट  अमित शिरगावकर!..
पोलीस बाॅईज संगमेश्वर, व विश्व समता कला मंच लोवले यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम नुकताच संपन्न!…

Spread the love

संगमेश्वर/ प्रतिनिधी- कमी वयात वाहन चालविणे, त्यासाठी आवश्यक असणारा परवाना, नसल्यास होणारी कारवाई, बदललेल्या  नवीन कायदे विषयक माहिती, नवीन योजना, नागरिकांचे हक्क, अधिकार, अल्पवयात होणारे गुन्हे, अल्पवयाने असलेल्या आपल्या पाल्यास कसे सावरावे, व्यसनांपासून दूर कसे ठेवावे, लैंगिक अत्याचार, असे विविध गुन्हे प्रकार व नवीन कायद्याची माहिती प्रत्येक नागरिकांनी समजावून घ्या. मदतीसाठी माझ्याकडे संपर्क साधा अशा प्रकारचे मार्गदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी तर्फे  ॲडव्होकेट  अमित शिरगावकर यांनी संगमेश्वर पोलीस स्टेशन येथील श्रम साफल्य  सभागृहात  पोलीस बा़ॅज संगमेश्वर व विश्व समता कलामंच लोवले यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात केले.

      
या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रे गायन, जल, पर्यावरण, स्वच्छता, कला क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, पत्रकारिता, पोलीस अशा क्षेत्रातील ६५ मोहनीय व्यक्तींना जिल्हा स्तरीय, व राज्यस्तरीय प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्याला विश्व समता
” प्रज्ञा गौरव पत्र ” देऊन यथोची सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.


   
 
संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस महिला हवालदार क्रांती सावंत , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे यांना बढती मिळाल्यामुळे त्यांचाही गौरव करण्यात आला. ज्युनियर ड्रामा फॅन आद्या शिरगावकर हिचा गौरव करण्यात आला.
    
    
याशिवाय माभळे, परचुरी  गावचे सरपंच उप सरपंच, शिक्षक, तंटामुक्ती अध्यक्ष, निरंकारी भक्तगण, संस्थांचे पदाधिकारी, महिला पालक पोलीस बंधू भगिनी यांना पुष्पगुच्छ देण्यात आले.

विशेष सत्कार …..
माजी सैनिक अनंत शिंदे, अडव्होकेट अमित शिरगावकर, पोलीस निरीक्षक अमित यादव, लोक निर्माणचे उपसंपादक युयुत्सू आर्ते, सामाजिक कार्यकर्त्या माधवी भिडे, महिला सुरक्षा समिती सदस्या अर्चिता  कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, ज्येष्ठ पत्रकार वाहब दळवी एजाज पटेल, विशेष कार्यकारी अधिकारी निलेश कदम, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण खातू, अध्यक्ष लायन्स  क्लब सुशांत  कोळवणकर, आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

  ‌‌
या दरम्यान मनोगत व्यक्त करताना श्रीकृष्ण खातू यांनी विश्व समता कला मंच व संगमेश्वर पोलीस बॉईज यांनी परिसरातील असणाऱ्या विविध क्षेत्रातील गुणवान व्यक्तींना संधी देऊन त्यांना सन्मानित केले यासाठी धन्यवाद दिले.‌ त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते युयूत्सू  आर्ते
पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी उपस्थितांना अनेक विषयांवर सखोल मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.


या कामी महत्त्वाचे योगदान गणपत शेठ रहाटे, राहुल शेठ कोकाटे, संजय शिंदे, पोलीस मित्र आकाश शेट्ये, प्रदीप चंदरकर, लाभले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस बॉईज तर्फे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व समता कला मंच संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव यांनी केले. यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे, संजय शिंदे,आकाश शेट्ये,अर्चिता कोकाटे यांनी विशेष मेहनत घेतली.

   ‌
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी केले तर आभार व समारोप दिनेश अंब्रे यांनी केलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page