
रत्नागिरी /प्रतिनिधी- रत्नागिरी मध्ये बावनदी येते राजस्थान मधील गाडी क्रमांक RJ 08 GA 2005 महेंद्रा बोलेरो गाडीतून कोणतीही परवानगी न घेता बकऱ्या व बोकडांची वाहतूक करताना दिसून आलेली आहे. सविस्तर माहिती घेतली असता राजस्थान मधून नाशिक मार्गे महाराष्ट्र मध्ये कोणतीही शासकीय परवानगी न घेता प्राण्यांची वाहतूक चालू आहे. प्राणी वाहतुकीचा परवानगी घेणे बंधनकारक असताना कोणतीही परवानगी त्यांच्याकडे नव्हती. असे दिसून आले आहे. तसेच प्राण्यांना उभे राहण्यासाठी मोबलीक जागा गरजेची असताना गचडी करून बकऱ्यांना भरण्यात आले होते. तसेच राजस्थान मधून 18 तासाचा प्रवास करून बकऱ्यांना आणण्यात आले आहे. त्यांना पाण्याची व चाऱ्याची सोय करणे गरजेचे असताना तेही न केल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करावी अशी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून यांनी मागणी करण्यात येत आहे. पशु वैद्यकीय डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट गरजेचे असताना तेही संबंधित गाडी चालकांकडे नव्हते. असे असताना वाहतूक कशी करण्यात आली असा प्रश्न उपस्थित होत आहे. परराज्यातून येताना नाशिक वरून वरून प्रवास करून येताना अनेक टोलनाके आणि पोलिसांचे चेक नाके लागतात तर मग गाड्यांचा प्रवास कसा झाला हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांचे ,पशु विभाग, आरटीओ, प्रशासनाचे दुर्लक्ष भ्रष्टाचाराची शक्यता ?
सदर गाडी मालकाला विचारणा केली असता खेड येथील चेक नाक्यावर पाचशे रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले आहे, तसेच प्रत्येक ठिकाणी दोनशे रुपये दिल्याचेही त्यांनी कबूल केलेले आहे. त्यामुळे राजस्थान मधून महाराष्ट्र मध्ये एन्ट्री करताना बॉर्डर कशी क्रॉस केली जाते हा प्रश्न उपस्थित झाला आहे , सगळ्या गोष्टीची चौकशी होणार का ? असे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे. मुळात गाडी नाशिक मार्गे पनवेल त्यानंतर रायगड सीमा क्रॉस करून नागिरी मध्ये आली. प्रत्येक ठिकाणी चेकिंग होऊन गाडीवर कारवाई का करण्यात आली नाही त्याचा खुलासा कोणी फार गरजेचे आहे. खरोखर अशी वस्तुस्थिती आहे का त्याची चौकशी पशुसंवर्धन विभागाने करणे गरजेचे आहे. तसेच तर विषयाची सखोल चौकशी होऊन दोशी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे तसे देखील निवेदन माननीय मुख्यमंत्री संबंधित मंत्री महोदयांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
लोकांच्या आरोग्याची खेळण्याचे काम चालू तरी प्रशासनाचे दुर्लक्ष…
सदर गाडीमधून होणाऱ्या प्राण्यांचे वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती. दर प्राण्यांना कोणता आजार आहे की नाही हेही दिसून आलेले नाही. त्यामुळे लोकांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळण्याचे काम चालू आहे. तर मग प्रशासन गप्प का हा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणाच्या आशीर्वादाने सदरची वाहतूक व धंदे चालू आहेत याची चौकशी होणे फार गरजेचे आहे. पालकमंत्री यांनी जातीनिशी लक्ष घालून सदर वाहतुकीवर कारवाई करावी अशी लोकांची मागणी आहे.
गाडीमध्ये प्राण्यांसाठी लागणाऱ्या वाहतुकी परवानगी तसे बद्दल नाहीच..
जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करावा. वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी त्यांच्याकडून योग्य परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु तसे कुठेही दिसून येत नाही.
मुंबई, पुणे ,नाशिक ,रायगड ,पालघर रत्नागिरी सह संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अवैद्य प्राण्यांची वाहतूक
सदर विषयाची चौकशी केली असता राजस्थान मधून मोठ्या प्रमाणामध्ये मटन विक्रीसाठी प्राण्यांची विक्री होत आहे सदर प्राण्यांच्या विक्रीमध्ये बकरी बोकड बैल व इतर प्राण्यांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी टोल चेक नाके व बॉर्डर वर पैसे देऊन प्राण्यांची वाहतूक अवैध तरुण चालू आहे. सदर प्राण्यांची सप्लाय मुंबई पुणे रायगड पालघर ठाणे व रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तशी माहिती गाडी चालवणारा ड्रायव्हर व त्याच्या साथीदारांनी दिलेली आहे. विषयाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आहे. व ती योग्य आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी च्या सीसीटीव्हीचा ही वापर करून चौकशी करावी अशी शासनाला विनंती असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनाच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल नाहीत..
महाराष्ट्र शासनाकडून परिवहन विभागा मार्फत वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनाच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच जनावरांना पाणी व खाण्याची व्यवस्था करून देणे बंधनकारक आहे. चार तासानंतर प्राण्यांना पाण्याची व खाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. योग्य अंतर बाळगणे ही गरजेचे आहे. परंतु मोकळी हवा प्राण्यांना मिळत नाही गचडी करून बांधण्यात येते असे गाडीमध्ये दिसून आले आहे. तसेच राजस्थान मधून मध्यप्रदेश मार्गे महाराष्ट्र राज्याचे सीमा क्रॉस करून नाशिक मार्गे ठाणा मुंबई रायगड पालघर पुणे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात अवैद्य जनावरांची वाहतूक चालू आहे.
(प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ च्या नियम ९६ मधील तरतुदींचे उल्लंघन…
प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ च्या नियम ९६ मधील तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण तथा भारतीय प्राणी कल्याण मंडळ व केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी वा व्यक्ती वा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे. असे प्रमाणपत्र जारी केले नसल्यास जनावरांच्या वाहतूक करण्यास वाहतूकदाराने नकार देणे अपेक्षित आहे. परंतु या कायद्याचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. राजस्थान मधून बकरी व बोकडांची अवैध्य वाहतूक चालू आहे. सदर वाहतुकी कोणतीही परवानगी नसल्याचे दिसून आले आहे.
पेटा कायद्यांची उल्लंघन…
प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६०, प्राण्यांच्या वाहतूकीचे नियम १९७८ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ या कायदा व नियमांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन केल्याखेरीज जनावरांची वाहतूक करण्यात येऊ नये. या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी आहे.