शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ – राशिभविष्य

Spread the love

मेष
(शुभ रंग – तांबडा)

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यस प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात काही तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. मित्रमंडळींना आज दूरच ठेवा.

वृषभ
(शुभ रंग – पिस्ता)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचा विचार कराल. सज्जनांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील.

मिथुन
( शुभ रंग – जांभळा)

आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमचे हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतात. कोणतेही धाडसाची कामे आज टाळा. आज फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करा.

कर्क
(शुभ रंग – निळा)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ असेल.

सिंह
(शुभ रंग – मरून)

कुठलीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही तुमची काही येणी असेल तर ती आज वसूल होऊ शकतील. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ हमखास मिळेल.

कन्या
( शुभ रंग – पिस्ता)

नवोदित कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात तुम्ही रमाल.

तूळ
( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकवणे आवश्यक आहे. काही रसिक मंडळी आज सहकुटुंब एखाद्या सहलीचे आयोजन करतील.

वृश्चिक
(शुभ रंग – चंदेरी)

शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर क्रोधावर लगाम ठेवा आईच्या आज्ञेत रहा.

धनु
(शुभ रंग- सोनेरी)

एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. विवाहेच्छुकांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. अतिउत्साहाच्या भरात तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. पत्नीने दिलेले सल्ले योग्यच असतील.

मकर
(शुभ रंग – मरून)

वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षित रित्या वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती करावी लागेल.

कुंभ
(शुभ रंग – आकाशी)

आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त खरेदी कराल आज संध्याकाळी हरवलेले सापडेल.

मीन
(शुभ रंग – केशरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असल्याने कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे जिवलग मित्र तुमच्या शब्दास मान देतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ संभवतो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page