मुंबई- शिवसेनेचे वांद्रे खेरवाडी येथील माजी नगरसेवक, माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे निधन झाले. दीर्घ आजारानंतर सोमवारी पहाटे साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनेच्या जुन्या पिढीतील एक कट्टर शिवसैनिक म्हणून श्रीकांत सरमळकर यांची ओखळ होती
श्रीकांत सरमळकर यांच्या पार्थिवावर उद्या, मंगळवारी २३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता वांद्रे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या महत्वाच्या नेत्यांपैकी श्रीकांत सरमळकर एक होते. मात्र काँग्रेसचा हात सोडत मार्च २०११ मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पुन्हा शिवसेना प्रवेश केला होता. शिवसेनेच्या पहिल्या पिढीतील आक्रमक शिवसैनिकांमध्ये सरमळकर यांचा समावेश होता. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या महत्वाच्या नेत्यांपैकी श्रीकांत सरमळकर एक होते. मात्र काँग्रेसचा हात सोडत मार्च २०११ मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पुन्हा शिवसेना प्रवेश केला होता.
सरमळकर हे १९८५ साली मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून तर १९९० मध्ये ते वांद्रे पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सरमळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “खेरवाडीचे माजी आमदार, माझे जुने सहकारी श्रीकांत सरमळकर ह्यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे जाणे वेदनादायी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. सरमळकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. भावपूर्ण श्रद्धांजली” अशा भावना नार्वेकरांनी ‘एक्स’वरुन शेअर केल्या आहेत.