
रत्नागिरी:- रत्नागिरीतील कुणबी समाजाचे नेते नंदकुमार मोहिते यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. कुणबी समाजासाठी झटणारा एक लढवय्या नेता हरपला असे उद्गार कुणबी समाजाच्या नेत्यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच काढले.
नंदकुमार मोहिते आणि विविध संघटनांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी काम केले. ओबीसी, कुळ कायदा जमानीविषय प्रश्नांचे ते गाढे अभ्यासक होते. लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयाचे अध्यक्ष पद त्यांनी सांभाळले. बळीराज सेना पक्षाचे सरचिटणीस पदाची जबाबदारी देखील त्यांनी उत्तमरित्या हाताळली. समाजाच्या विविध प्रश्नांची जाण त्यांना होती. जिल्हा परिषद सदस्य पदावर निवडून आल्यानंतर पाच वर्ष त्यांनी विविध प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र गुरुवारी त्यांची प्राणज्योत मावळली.