
मुंबई- समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधानसभेत सादर केला. हा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
अबू आझमी यांना औरंगजेबचे उदात्तीकरण भोवले. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे अबू आझमी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विधानसभेत निषेध करण्यात आला. विधानसभेत एकमताने अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांना निलंबित करण्यात आले आहे.
अबू आझमी यांच्या औरंगजेबावरील वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अबू आझमींना निलंबित करावे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सत्ताधारी नेत्यांकडून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी करण्यात आली. यानंतर आजही त्याच मुद्द्यावरुन सभागृहात मोठा गोंधळ झाला आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला.
आझमींचे सदस्यत्व रद्द करा- मुनगंटीवार…
सपा आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यत निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी औरंगजेबाबद्दल केलेले वक्तव्य त्यांना भोवले आहे. त्यांना अधिवेशन संपेपर्यत निलंबित करू नका त्यांचे सदस्यत्व रद्द करा अशी मागणी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
नेमके काय म्हणाले होते अबू आझमी?…
मोगल बादशहा औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्यात व छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती. उलट त्याच्याच काळात भारताला सोन्याची खाण म्हणून संबोधले जात होते, असा वादग्रस्त दावा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला आहे. औरंगजेबाची कबर खोदण्याबद्दल बोलणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत. सद्यस्थितीत महाराष्ट्रासह देशात मुस्लिमांवर अत्याचार वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24 टक्के एवढा होता. भारताला त्यावेळी ‘सोने की चिड़िया’, असे म्हटले जात होते. असे असताना चुकीचे म्हणू का? छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबची लढाई झाली, ती राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही.