खोडसाळ बातम्या पसरवून भाजपची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा!..

Spread the love

भाजपच्या शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे मागणी, भाजप पदाधिकारी आक्रमक

रत्नागिरी : प्रतिनिधी- लोकसभा निवडणुकीच्या वातावरणाला सुरुवात झाली असून सोशल मीडियावरती तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांबद्दल आणि पक्षाबद्दल अनेक चुकीचे संदर्भ देत मजकूर पसरविले जात आहेत. अश्या फेक बातम्या पसरविणाऱ्या तथाकथित पत्रकारविरोधात भाजप पदाधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

शुक्रवारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली व आपले म्हणणे आक्रमकपणे मांडले. गुरुवारी सायंकाळनंतर सोशल मिडीयावर बांधकाम मंत्री मा. रविंद्रजी चव्हाण यांचेबाबत आक्षेपार्ह विधाने करत एक पोस्ट प्रसिद्ध झालेली आढळून आली आहे. ज्या पोस्टच्या चुकीच्या मजकुरामुळे भाजपा नेते व कार्यकर्ते यांच्यात तेढ निर्माण करणे, गैरसमज निर्माण करणे असे पोस्टकर्त्याचे हेतु असल्याचे सिद्ध होते. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अश्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून यामुळे वातावरण गढूळ करून भाजपा विरोधकांना त्याचा फायदा करून घेण्याचा उद्देश स्पष्ट दिसून येतो. अश्या प्रकारच्या वादग्रस्त पोस्ट लिहून पक्षीय नेते, कार्यकर्ते यांच्यात तेढ निर्माण करण्याचा उद्दिष्ट पोस्ट करणाऱ्याचा असावा.याबाबत योग्य तो तपास आणि खातरजमा करून या पोस्टकर्त्यावर तसेच लेखकावर त्वरीत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. भारतीय जनता पार्टीचे मत नसताना ते मत भाजपचे आहे अश्या आशयाच्या फेक बातम्या पसरविण्यात येत आहेत. रत्नागिरीतील रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून अश्या फेक बातम्या पसरवून निवडणुकीत कलुशित वातावरण केले जात आहे. त्यामुळे त्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद जठार, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, लोकसभा सहप्रमुख बाळासाहेब माने, विनोद म्हस्के, सतेज नलावडे, सोनाली आंबेकर, प्राजक्ता रूमडे, योगेश मुळ्ये, संदीप नाचणकर, दादा दळी, निलेश आखाडे, मंदार खंडकर, राजेंद्र फाळके, अशोक मयेकर, सुशांत पाटकर, संकेत मयेकर,आदी उपस्थित होते.

व्हॉट्सपवरील मजकूर कुणाचा हे शोधणे शक्य नाही – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

व्हॉट्सपवरील मजकूर कुणाचा हे शोधणे शक्य नसल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावर आक्रमक होत भाजप नेते बाळासाहेब माने आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भाजपच्या ग्रामविकास व पंचायतराज सेलच्या योगेश हळदवणेकर यांचा मोबाईल का जप्त केलात? असा जाब विचारला. त्यावर कुलकर्णी निशब्द झाले. आपल्याला त्याबद्दल काहीच कल्पना नाही, असे त्यांनी उत्तर दिले. पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांना यांबद्दल माहिती नाही, मग यंत्रणा नेमकी कोण चालवत आहे ? असा सवाल निर्माण होत आहे.

पोलिस अधीक्षकांनी निवेदने कचऱ्यात टाकली काय? – योगेश हळदवणेकर

गेले महिनाभर माझा मोबाईल जप्त करून पोलीस नेमका कोणता शोध लावत आहेत? जर व्हॉट्सॲपवरील कोणतीही माहिती मिळवता येणे शक्य नाही असे पोलीस अधीक्षक म्हणत असतील तर मोबाईल जप्त करून माझे नुकसान करण्याचा हेतू आहे काय ? पोलिस अधीक्षकांना दोन निवेदन देऊनही स्वतंत्र चौकशी व तपास करण्यात येत नाही. आणि याबद्दल त्यांना काहीच माहिती नसल्याचे जर ते सांगत असतील तर मग मी दिलेली निवेदने कचऱ्यात टाकली काय ? असा सवाल भाजपच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष योगेश हळदवणेकर यांनी केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page