प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत कृषी संबंधी विशेष ग्रामसभा लावून शेतकऱ्यांना सहकार्य करावे….

Spread the love

भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश पोतकर यांचे सर्व ग्रामपंचायत आवाहन !

गेल्या काही वर्षांपासून कोकणातील आंबा काजू बागातदार आणि इतर सर्व शेतकरी विविध नैसर्गिक आपत्तींशी झगडत आहेत त्यात अवकाळी पाऊस, वाढीव तापमान थ्रीप्सचा प्रादुर्भाव किंवा अनेक रोगांशी ते सामना करताना त्यांची दमछाक होत आहे. अशा वेळेला एकटा शेतकरी किंवा काही करू शकत नाही. त्यासाठी प्रत्येक गावाने पुढाकार घेऊन त्यांना सहकार्य करावे. कोकणातील प्रत्येक गावात शेतकरी, आंबा बागातदार, काजू बागातदार आहेत. जिल्हय़ातील सर्व ग्रामपंचायत यांनी कृषी संबंधी विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या भागातील ग्रामपंचायत सहकार्याचे ठराव करण्यात यावे. त्याच्यामध्ये कर्जमाफी, बँकांचे अनाधिकृत, बेकायदेशीर पद्धतीने शेतकर्‍यांना नोटिसा यांना विरोध, कृषी पंपांची वाढीव बिले आणि त्यावर सबसिडी, शेतकर्‍यांचे अडकलेले प्रस्ताव आणि १०० टक्के नुकसान भरपाई तात्काळ मिळण्यासाठी उत्तमोत्तम ठराव करावेत.

जेणेकरून त्याला एक मूर्त स्वरूप प्राप्त होईल यामध्ये कुठलेही पक्षाचा राजकारण न आणता शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत काम केले तर एक मोठी चळवळ उभी राहील आणि सदर ठराव हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वरिष्ठ स्तरावर पाठवण्याची विनंती करण्यात यावी. जेणेकरून शेतकरी आंदोलनाला एक उत्तम असं व्यासपीठ उभे राहील.

तरी रत्नागिरी जिल्ह्यातीलच नाही तर कोकणातील सर्व ग्रामपंचायत यांनी कृषी किंवा शेतकऱ्यांसाठी विशेष ग्रामसभा आयोजित करून सहकार्य करावे ही सर्वांना मी विनंती करीत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page