
सी व्होटरच्या सर्वेक्षणात सर्वात आश्चर्यकारक बाब समोर आली आहे की, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात भाजप-शिंदे- पवार युतीवर जनता खुश आहे का, की त्यात बदल करायचा असा प्रश्न विचारण्यात आला.
*महायुतीची झोप उडवणारा सर्वे समोर; आकडेवारी पाहिली तर एकनाथ शिंदेंनाही फुटेल घाम…*
*मुंबई:* महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील. यंदा महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत होणार असल्याचे निश्चित आहे. निवडणुकीच्या या वातावरण निर्मितीत निवडणुकीच्या रणधुमाळीत सी व्होटरचे सर्वेक्षण समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार, 51 टक्के जनतेने महायुती सरकारची धाकधूक वाढणारे संकेत दिले आहेत. . सी व्होटरच्या या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात कोणासाठी वातावरण तयार होत आहे, जनतेचा कल कुणाकडे आहे, हे जाणून घेण्यात आले आहे.
सी व्होटरच्या सर्वेक्षणात सर्वात आश्चर्यकारक बाब समोर आली आहे की, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात भाजप-शिंदे- पवार युतीवर जनता खुश आहे का, की त्यात बदल करायचा असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 51.3 टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले. आम्हाला राग आहे आणि आम्हाला हे सरकार बदलायचे असल्याचे प्रतिक्रीया जनतेतून समोर आली आहे.
तर, 41.0 टक्के लोकांनी आम्हाला हे सरकार बदलायचे नसल्याचे म्हटले आहे. सरकारवर आमचा राग नाही, आम्हाला बदल नकोय, असे मत मांडत 41.0 टक्के जनतेने राज्यात भाजप- शिंदे सरकारची मागणी केली आहे. तर 4 टक्के लोकांनी आत्ताच याबद्दल काहीही बोलू शकत नाहीत. असे म्हटले आहे.
*मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रातील जनतेची निवड…*
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी कुणाची निवड कराल, असा प्रश्न विचारला असता पहिल्या क्रमांकावर एकनाथ शिंदे असून 27.6 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी पसंती दिली आहे. तर 22.9 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, फक्त 10.8 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस आणि 5.9 टक्के लोकांनी शरद पवार यांच्या नावाल पसंत दिली आहे. तर अजित पवार यांना फक्त 3.1 टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे.
*भाजप आणि शिवसेना सरकारची कामगिरी कशी होती?..*
52.5 टक्के लोकांनी ते चांगली असल्याचे म्हटले आहे. 21.5 टक्के लोकांनी याला सरासरी कामगिरी म्हटले आहे, तर 23.2 टक्के लोकांनी अत्यंत वाईट कामगिरी असल्याचे म्हटले आहे.
*निवडणुकीवर कोणते घटक प्रभाव टाकतील?..*
सर्वेक्षणात हा प्रश्न विचारला असता, 23.0 टक्के लोकांनी मराठा आरक्षणाला प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांमध्ये नाव दिले, तर 12.2 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींची कामगिरी महत्त्वाची मानली. 9.8 टक्के लोकांनी झोपडपट्टी पुनर्विकास हा महत्त्वाचा घटक मानला. ७ टक्के लोकांनी सरकारच्या कामगिरीबद्दल आणि योजनांबद्दल बोलले. ८.२ टक्के लोकांनी सरकारी रुग्णालयांची स्थिती निवडणुकीवर परिणाम करणारा घटक असल्याचे सांगितले. ६ टक्के लोकांनी राज्याची आर्थिक स्थिती सांगितली तर २.५ टक्के लोकांनी राष्ट्रवादीतील फूट हा एक मोठा घटक असल्याचे सांगितले.