घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला…

Spread the love

घाटकोपर, मुंबई- घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास होऊनही बचाव कार्य थांबलेले नाही. एनडीआरएफ, अग्निशामक दल, महानगर पालिकेची यंत्रणा होर्डिंगचा ढिगारा काढण्याचे काम करत आहेत.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास होऊनही बचाव कार्य थांबलेले नाही. एनडीआरएफ, अग्निशामक दल, महानगर पालिकेची यंत्रणा होर्डिंगचा ढिगारा काढण्याचे काम करत आहेत.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास होऊनही बचाव कार्य थांबलेले नाही. एनडीआरएफ, अग्निशामक दल, महानगर पालिकेची यंत्रणा होर्डिंगचा ढिगारा काढण्याचे काम करत आहेत.

मुंबईमध्ये सोमवारी पावसाने आणि वादळी वाऱ्याने भीषण थैमान घातले. या वादळी वाऱ्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग कोसळले. या घटनेला ६० तास उलटून देखील बचाव कार्य सुरूच आहे. एनडीआरएफ, अग्निशामक दल, महानगर पालिकेची यंत्रणा होर्डिंगचा ढिगारा उपसण्याचे काम करत आहेत. या दुर्दैवी घटनेतील मृतांचा आकडा वाढला देखील १५ वरून १७ वर पोहोचला आहे. दरम्यान, होर्डिंग मालक फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ७ पथके रवाना केली आहे.

🔹️बुधवारी आढळले आणखी दोन मृतदेह…

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्यावर मोठ्या प्रमाणात बचाव कार्य राबवण्यात आले. हे बचाव कार्य सुरूच आहे. बुधवारी होर्डिंगचा लोखंडी ढीगारा उपसतांना एका कारमध्ये एका महिलेचा आणि पुरुषाचा मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा हा १७ वर गेला आहे. दुर्घटनास्थळी अजूनही मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा असून ते बाजूला करण्याचे काम बचाव दलातील कर्मचारी करत आहेत.

🔹️होर्डिंग उभरतांना नियमांची पायमल्ली…

हे होर्डिंग तयार करतांना नियमांची पायमल्ली करण्यात आली. होर्डिंगची जागा देखील अनधिकृत होती. या होर्डिंग संदर्भात मालकाला नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, या सर्वांना बाजूला सारत हे होर्डिंग तसेच ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे या होर्डिंगची नोंद ही लिमका बूक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील होती. अखेर सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळलून १७ जणांना जीव गमवावा लागला.

🔹️मुंबईतल्या सगळ्या होर्डिंगचं होणार स्पेशल ऑडिट…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या सगळ्या होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. तर परवाना नसलेली होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. ही घटना घटना दुर्दैवी असून महापालिकेची यंत्रणा व राज्याची डिझास्टर टीम पथक बचाव कार्य राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page