
संगमेश्वर /प्रतिनिधी- या कार्यक्रम साठी प्रमुख पाहुणे संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री शंकर नागरगोजे साहेब तसेंच पोलीस प्रतिनिधी रविंदकुमार, संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते अजिंक्यराज सुर्वे, जेष्ठ पत्रकार वहाब दळवी, सौं सिद्धी पाथरे, संस्थेचे अध्यक्ष श्री धनाजी भांगे, मुख्याध्यापिका सौं राजश्री भांगे, शिक्षिका अकसा मुल्ला. मदतनीस अंजली रहाटे, तसेच माझे सर्व पालकप्रतिनिधी होते.

उपस्थितीत विविध वेशभूषा परिधान करुन आलेले विध्यार्थी व विध्यार्थीनी यांनी मान्यवरांचे लक्ष वेधून आपण कोणत्या वेशभूषात आहेत. या वेशभूषा डॉक्टर, पोलीस, शेतकरी, सुतार, शिक्षक, वैमाणिक, सामाजिक स्टारवरील विविध सहायक असणारे आकर्षित अशा वेशभूषा परिधान केले होत्या. याविषयी दोन शब्द मनोगत ही व्यक्त केली . या नंतर पालक व विध्यार्थी यांनी विविध शैक्षणिक साहित्य तयार केले यात. विविध कलागुणांनी आपले कौशल्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे त्यातील नंबर काढण्यात आले.१ला नंबर सौं स्मिता खेडेकर २ रा नंबर सौं सेजल नारकर ३ रा नंबर स्वरा सुर्वे आदींनी आपल्या पाल्यसमवेत छान असे शैक्षणिक साहित्यात यश संपादन केले. यानंतर मान्यवरांचे मनोगते झाली यात नागरगोजे साहेबांनी उपस्थित पालकांना आपल्या पाल्याच्या वेशभूशेबद्दल विध्यार्थी काय बनला या विषयी जाणीव निर्माण होईल. व वहाब भाई यांनी उपस्थित पालकांना सध्याच्या युगाची जाणीव निर्माण करुन दिली.

पालक व विध्यार्थी यांच खूप जवळच नातं आहे. यात पालकांनी विशेष लक्ष देऊन पाल्यांची उत्तम रित्या प्रगती करुन घेणे गरजेचे आहे. संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या पाथरे काकी यांनी आपल्या पाल्याना वाचन ची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. विविध गोष्टी ची कविताची पुस्तके संग्रहीत असावीत व विध्यार्थी ही भविष्यात लेखक ही निर्माण व्हावेत असे संबोधित केले.
सूत्रसंचालन अकसा मॅडम यांनी व आभार प्रदर्शन सौं राजश्री भांगे मॅडम यांनी केले. अश्या रीतीने कार्यक्रमाची सांगता झाली.