
मुंबई- मुंबई उपनगरातील गोरेगाव येथील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग लागलेल्या इमारतीत काही कुटुंब अडकल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरातील गोरेगाव येथील एका २६ मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. गोरेगाव पश्चिमेकडील एस वी रोड परिसरातील अनमोल टॉवर या उंच इमारतीला ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. एसवी रोड वरील महेश नगर परिसरातील ही इमारत आहे. या इमारतीत काही कुटुंबे अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आगीची माहिती मिळतात मुंबई अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम सुरु आहे.