*श्रीकृष्ण खातू /धामणी –* जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधून विविध प्रकारचे स्तुत्य उपक्रम नेहमीच राबवले जातात.त्याप्रमाणें दरवर्षी हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.गावा,गावातील मुलांनी अशा क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेऊन ज्ञान,अनुभव,कल्पकता, प्रेरणा घेऊन नैपुण्य मिळवण्याच्या क्षमतांमध्ये आवडीने वाढ करा, तसेच खेळाच्या व्यायामाने आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवून उत्तम खेळाडू बना,अशा प्रकारचे मार्गदर्शन पंचायत समितीचे माखजन प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने यांनी स्पर्धा उदघाटनाच्या प्रसंगी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून, क्रीडा ध्वज फडकवून तसेच क्रीडा ज्योत केल्यावर क्रीडा शपथ घेऊन मान्यवरांच्या शुभहस्ते मैदानावर श्रीफळ करण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना बुरंबाड गावच्या सरपंचा नम्रता कवळकर यांनी मैदानावरील खेळ खेळताना सांघिक व मित्रत्वाची भावना जोपासून खेळीमेळीने प्रत्येकाने खेळा व उत्तम यश संपादन करून आपल्या शाळेचे नाव लौकिक करा, तसेच या स्पर्धेचं शिक्षकांनी केलेले नियोजन उत्तम प्रकारे व कौतुकास्पद असल्याचे नमूद करून मनोगत व्यक्त केले,व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेतील मोठा गट व लहान गट सांघिक व वैयक्तिक बक्षिसे बुरंबाडच्या सरपंचा नम्रता कवळकर यांच्यावतीने देण्यात आली.
जनरल ट्रॉफी आरवली केंद्राने आपले कौशल्य पणाला लावून पटकावली .
यावेळी संदीप कवळकर , शालेय व्यवस्था समिती अध्यक्ष दिक्षा जोगले, मुरडवचे पोलीस पाटील राजेंद्र मेणे, ग्रामपंचायत सदस्य नीलिमा कवळकर, धामापूर अध्यक्ष.. गुरव, आंबवपोंक्षे येथील समीक्षा गुरव, प्रकाश शंकर कदम प्रभागातील सर्व केंद्रप्रमुख सर्व शिक्षक बंधू भगिनी पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
चहापान व भोजन व्यवस्था उपस्थित सर्वांसाठी पालक,ग्रामस्थ, व देणगीदार यांच्यावतीने करण्यात आली होती. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, बुरंबाड येथील पालक व ग्रामस्थांनी खूप परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे नियोजन केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड, दिगंबर सुर्वे, बाबासाहेब यादव, तसेच शिक्षक अविनाश पाटील, रामचंद्र निकम, रविंद्र घाणेकर,शांताराम नांदिवडेकर, अशोक जायभाये,संतोष खेडेकर,सुधीर जाधव, संतोष महाडीक,नितीन थेराडे, प्राची पाटणकर, प्रवीण सावंत कल्पना नांदिवडेकर,सविता पोंक्षे ,सारिका खेडेकर तसेच अन्य शिक्षक बंधू भगिनींनी केले होते.
सूत्रसंचलन रविंद्र घाणेकर यांनी केले तर अविनाश पाटील .यांनी उपस्थितांचे ,व्यवस्थापनाचे पालक,ग्रामस्थांचे मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.