
“कोकण हा शांत प्रदेश आहे विनाकारण पेटवापेटवी करू नका”, निलेश राणे यांचं वक्तव्य, कोकणाची विनाकारण सोशल मीडियावर बदनामी करु नये. होळीच्या पार्श्वभूमीवर राजापूरात घडलेल्या प्रसंगाबाबत निलेश राणे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
रत्नागिरी/ प्रतिनिधी- कोकणात महत्त्वाचा सण म्हणजे शिमगा. या शिमगोत्साला गालबोट लागल्याचं चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. राजापूरात शिमगोत्सवाला पालखीचा मोठा मान असतो. या पालखी उत्सावाच्या वेळा दोन गटात वााद झाले होते. याबाबत आमदार निलेश राणे यांनी गैरसमज पसरवणाऱ्या आणि कोकणाची बदनामी करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
राजापूरात झालेल्या दोन गटांतील वाद विवाद हे पोलीसांनी आटोक्यात आणले मात्र विनाकारण कोकणात असंतोष पसरवू नका असं आवाहन निलेश राणे यांनी केलं आहे. निलेश राणे म्हणाले की, काही नेत्यांच्या आणि सोशल मीडिया इंफ्लुएंसरच्या सोशल मीडियावरुन असं दाखवण्यात आलंं की, राजापूरात पालखी सोहळ्याच्या वेळी दोन गटांतील वाद वाढल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. मत्र असं असलं तरी पोलीसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. त्यामुळे कोकण पेटलं कींवा कोकणात हिंसाचार झाला आहे, अशा चर्चांना बळी पडू नका असं निलेश राणे यांनी सांगितलं आहे. पुढे राणे असंही म्हणाले की, कोकणात सगळे सण आनंदाने साजरे होतात आणि आमची सत्ता असे पर्यंत कायमच आनंदाने, शांततेत होतील असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलं आहे. भविष्यातही कोणत्याही सणांच्या पार्श्वभूमीवर कोकणात कधीही तणावपूर्ण वातावरण राहणार नाही, अशी ग्वाही देखील निलेश राणे यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय ?…
राजापूरात पाच वर्षातून दोनवेळेला होळीच्या निमित्ताने पालखी सोहळा होत असतो. ही पालखी संपूर्ण गावातून नेली जाते. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे नेहमीच्या रस्त्याने पालखी मार्गस्थ होत असताना काही जणांनी या पालखी पुढे जाऊ नयेसाठी रस्ता अडवत गेट बंद केला होता. दरम्यान पोलीसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्याचवेळी काही समाजकंटकांनी याचा विपर्यास करत या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले. .यातून असं दाखवण्यात आलं की राजापूर पेटलं कोकणात हिंसाचार झाला. मात्र असं काहीही झालेलं नसून फक्त समाजात काही जण असंतोष पसरवत आहेत, असं परखड मत राणेंनी व्यक्त केलं आहे. विनाकारण कोकणाची बदनामी करणं थांबवावं असा इशाराही राणेंनी दिला आहे.
सोशल मीडीयावर ज्या प्रकारे व्हिडीओ बनवून चुकीच्या पद्धतीने जे काही दाखवलं जात आहे, तसं काहीही घडलेलं नाही. निलेश राणे पुढे असंही म्हणाले की, जे कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना सांगणं आहे की, यासगळ्यात नेत्यांना पत्रकारांना काही होत नाही. अडकली जाते ती सर्वसामान्य जनता. या सगळ्यामध्ये गोरगरीब जनता आणि त्याचं कुटुंब भरडलं जातंं. त्यांच्यामागे पोलीस तपास, चौकशीचे फेरे सुरु होतात. त्यामुळे विनाकारण वाद वाढविण्याचा प्रयत्न करु नये असं निलेश राणे म्हणाले आहेत. कोकणाची विनाकारण बदनामी करु नका, कोकणात सगळेच सण आतापर्यंत शांततेत पार पडले आहेत आणि पुढेही शांततेच पार पडणार आहे यासाठीच आम्ही कायम प्रयत्नशील असणार आहोत, अशी ठाम भूमिका आमदार निलेश राणे यांनी मांडली आहे.