डिजीटल पेमेंट-AI यासह अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी आणिल बिल गेट्स यांच्यात चर्चा सुरु
PM Modi Bill Gates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यात डिजीटल पेमेंट ते कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता आणि विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू झालीय.
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यात विविध विषयांवर चर्चा झालीय. या चर्चेत पंतप्रधान मोदी आणि गेट्स यांनी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, हवामान बदलाला तोंड देण्याच्या प्रयत्नांपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. याआधी गुरुवारी त्यांच्या संभाषणाचा प्रमोशनल टीझर रिलीज करण्यात आला होता.
काय म्हणाले पंतप्रधान…
भारतीय केवळ तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाहीत तर प्रत्यक्षात आणखी पुढं जात असल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. एआयचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणले की ‘भारतात जन्मलेलं मूल ‘एआय’ आणि ‘एआय’ (मराठीत आई) असं ओरडतं.’ तसंच पंतप्रधानांनी गेट्स यांना नमो ॲपवरील फोटो बूथ वापरुन सेल्फी घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. नमो ॲपनं अलीकडेच एक नवीन एआय पॉवर्ड फोटो बूथ वैशिष्ट्य सादर केलं. त्यामुळे वापरकर्त्यांना फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करुन पंतप्रधानांसोबतचे फोटो शोधून मिळतात. AI हे सरकारनं लक्ष्य केलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. भारतात AI तयार करण्याच्या दृष्टीकोनाला पुढे नेत, मंत्रिमंडळानं अलीकडेच 10 हजार 371.92 कोटी रुपयांच्या बजेटसह सर्वसमावेशक राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडिया AI’ मिशनला मंजुरी दिली. ‘इंडिया AI मिशन’ सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील धोरणात्मक कार्यक्रम आणि भागीदारीद्वारे AI या उपक्रमाला प्रोत्साहन देणार असल्याच पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
यापूर्वीही गेट्स यांनी केलं होतं भारताचं कौतुक…
यापूर्वीही एका मुलाखतीत बिल गेट्स यांनी भारतात AI वर होत असलेल्या कामाचं कौतुक केलं होतं. गेट्स म्हणाले होते, ‘AI वर या देशात आश्चर्यकारक काम सुरू आहे. तुमच्याकडे आयआयटी ही अतिशय अत्याधुनिक आहे. भारतात AI च्या क्षेत्रात खूप मोठं नेतृत्व असेल. ते नेतृत्व आरोग्य आणि कृषी सारख्या क्षेत्रात गरीबांना मदत करेल. तेव्हा आमच्या फाउंडेशनला त्याला आकार देण्यात आणि समर्थन करण्यात अभिमान वाटेल.”
*बिल गेट्स यांनी भारत दौऱ्यात पंतप्रधान मोदींची भेट घेतली..*
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी 1 मार्च 2024 रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अनेक जागतिक समस्या आणि बदलाच्या गरजांवर दोघांमध्ये चर्चा झाली.
*बिल हे जगातील 7 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत..*
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे जगातील 7 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती 131.3 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 10.94 लाख कोटी रुपये आहे. बिल गेट्स यांनी 1975 मध्ये मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. त्यांनी 2000 पर्यंत कंपनीत सीईओ पद भूषवले.
*पंतप्रधानांनी बिल गेट्स यांना नमो ॲपच्या ‘फोटो बूथ’ वैशिष्ट्याबद्दल सांगितले, जे पाहून गेट्स आश्चर्यचकित झाले…*
पंतप्रधानांनी बिल गेट्स यांना नमो ॲपच्या ‘फोटो बूथ’ वैशिष्ट्याबद्दल सांगितले, जे पाहून गेट्स आश्चर्यचकित झाले.
सायकल कशी चालवायची हे माहित नव्हते, आज ड्रोन चालवतोय
मुलाखतीदरम्यान बिल गेट्स पंतप्रधान मोदींना म्हणतात, ‘तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची थीम अशी आहे की ती प्रत्येकासाठी असावी.’ यावर पीएम मोदी म्हणाले, ‘गावातील महिला म्हणजे- गायी-म्हशीला चारा खाऊ घालणे, दूध काढणे.
पण तसे नाही. मी त्यांच्या हातात तंत्रज्ञान (ड्रोन्स) दिले आहे. आजकाल मी ड्रोन दीदींशी बोलतो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. ती म्हणते की आम्हाला सायकल कशी चालवायची हे माहित नव्हते, आज आम्ही पायलट झालो आहोत, ड्रोन उडवणार आहोत.

माझे जॅकेट रिसायकल मटेरिअलचे बनलेले आहे असे पंतप्रधान म्हणाले
गेट्स यांनी मोदींना विचारले- भारताचा इतिहासच पर्यावरणपूरक राहिला आहे, त्याला वर्तमान काळाशी कसे जोडता येईल. याला उत्तर देताना पंतप्रधानांनी त्यांचे जॅकेट दाखवले आणि म्हणाले, ते रिसायकल मटेरिअलचे बनलेले आहे.
कोरोनाच्या काळात लस बनवून ती देशभर आणि जगभर वितरित करण्याच्या प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले, ‘लोकांना शिक्षित करा आणि त्यांना सोबत घ्या. ही व्हायरस विरुद्ध सरकारची लढाई नाही तर जीवन विरुद्ध व्हायरसची लढाई आहे.