
डेब्यू सामन्यातच ध्रुव जुरैल (Dhruv Jurel) टीम इंडियासाठी संकटमोचक म्हणून समोर आला आहे…
अर्धशतक ठोकल्यावर ‘कारगिल हिरो’ वडिलांना ध्रुवचा सॅल्यूट, अंपायरनेही वाजवल्या टाळ्या..
IND vs ENG, Dhruv Jurel : सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका (IND vs ENG Test) खेळवली जात आहे. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर असून युवा खेळाडूंनी या मालिकेत सर्वांचं मन जिंकलंय. अशातच डेब्यू सामन्यातच ध्रुव जुरैल (Dhruv Jurel) टीम इंडियासाठी संकटमोचक म्हणून समोर आला आहे. टीम इंडिया अडचणीत असताना ध्रुवने संयमी 90 धावांची खेळी केली. त्यामुळे सध्या त्याचं कौतूक होताना दिसतंय. अशातच आता अर्धशतक ठोकल्यानंतर ध्रुवने ज्याप्रकारे सेलिब्रेशन त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या व्हायरल होताना दिसतोय.
इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाचा डाव ढेपाळला. यशस्वी जयस्वालने 73 धावांची खेळी केली. मात्र, त्यानंतर एकही फलंदाज मैदानात टिकला नाही. त्यानंतर ध्रुव जुरैल मैदानात आला अन् एका बाजूने टिकून खेळू लागला. कुलदीप यादवने साथ दिली मात्र, कुलदीप बाद झाल्यावर एकट्या ध्रुवच्या खांद्यावर फलंदाजीची जबाबदारी होती. ध्रुवने खऱ्या अर्थाने फलंदाजीची किमया दाखवली अन् आक्रमक फटकेबाजी केली. सहा फोर आणि चार सिक्स मारत ध्रुवने 90 धावा कुटल्या. मात्र, हेटलीच्या बॉलवर ध्रुव बोल्ड झाला.