
देवरुख- साडवली सह्याद्रीनगर मिञमंडळाच्या नवराञौत्सवात मंडळातर्फे प्रायोजक सौ.संगीता सुखदेव जाधव यांनी घेतलेल्या पाककला स्पर्धेत देवरुखच्या सौ.भारती जयंत राजवाडे यांनी बनवलेल्या काकडीच्या केकला प्रथम क्रमांक मिळाला.आमदार शेखर निकम यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. ३० ग्रॅम चांदीचे बिस्किट व प्रमाणपञ असे बक्षिस होते.
काकडीपासुन पदार्थ तयार करणे असा विषय होता. ३० महिला सहभागी झाल्या होत्या.याचे परीक्षण ज्ञानेश्वर येडगे व सुहास तुळसणकर उत्कर्ष ॲकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर देवरुख यांनी केले.
स्पर्धेत सौ.प्राजक्ता प्रदिप घडशी, गीता सोनवडेकर, सौ.प्रतिभा केदारी, सौ.सावी खरात, सौ.कविता सुर्वे, सौ.सुनिता मराठे, सौ. अनवेशा मिरजे, सौ.श्रेया पाडळकर, सौ.हर्षदा विंचु या विजेत्यांना २० ग्रॅम,१०ग्रॅम,५ ग्रॅम चांदीची बिस्किटे व सन्मानपञ देवुन गौरवण्यात आले.
बक्षिस वितरण प्रसंगी आमदार शेखर निकम,माजी राज्यमंञी रवींद्र माने, सौ.नेहा माने, माजी आमदार सुभाष बने, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने,सौ.पूजा शेखर निकम, मंडळाचे अध्यक्ष सुखदेव जाधव, उपाध्यक्ष संजय लाड, प्रायोजक व अध्यक्षा सौ.संगीता सुखदेव जाधव, अशोक लिमये, वाडकर, मोहन कनावजे, पप्पु नाखरेकर, पप्पा भिंगार्डे, यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.या ठिकाणी गरबाप्रेमींची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.