तुळजापूर- आर्थिक वर्षात तुळजाभवानी माता देवस्थानला विक्रमी ६६ कोटी ८१लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी तब्बल १६ किलो सोनेआणि २७० किलो चांदी भक्तांनी देवीचरणी अर्पण केली. मागीलवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात यंदा १२ कोटींची भर पडली आहे. तर सोने वचांदीच्या देणगीत मोठी घट झाली आहे. देणगीबरोबरच खर्चातही वाढझाली आहे. २०२२-२३ मध्ये १५ कोटी ६३ लाख रूपयांचा खर्च झालाहोता, आता तो खर्च २० कोटी ९१ लाखांवर गेला आहे.भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिरात करण्यात येत असलेल्याउपाययोजनांमुळे उत्पन्नात वाढ झाली. मंदिर संस्थानने भाविकांसाठी५०० रूपये प्रतीव्यक्ती सशुल्क दर्शनची सुविधा उपलब्ध करून दिलीआहे. या शिवाय सशुल्क दर्शन १०० रूपयांवरून २०० रुपये, तरनवरात्रोत्सवात ३०० रूपये आकारणी केली जाते.
खर्चातही वाढ…
२०२२-२३ या वर्षात मंदिर समितीचा१५ कोटी ६३ लाख रुपये निधी खर्चझाला होता. सन २०२३-२४ मध्ये ५कोटीची वाढ होऊन २० कोटी ९३लाख रूपयांवर खर्च पोहोचलाआहे. यामध्ये सुरक्षेवर ६ कोटी ६७लाख, स्वच्छतेवर ५ कोटी ४९लाख तर वेतनावर ३ कोटी २५लाख, ३.४९ कोटी अभियांत्रिकीमहाविद्यालयास, १.६७ कोटीसैनिक विद्यालयास मदत केली आहे.