“तुम्हाला कामं करणारी की स्थगिती…”; देवेंद्र फडणवीसांची विरोधकांविरुद्ध जोरदार फटकेबाजी…

Spread the love

राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारसभा घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

नाशिक : राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारसभा घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. देवयांनी फरांदे, सीमा हीरे आणि राहुल ढीकले यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.

आपल्या भाषणात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज आपण निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत. २०१४ मध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नाशिकचा चेहरा बदलण्याचे काम हातात घेण्यात आले. आता पुन्हा एकदा कुंभमेळा येत आहेत. जेवढा लागेल तेवढा पैसे आपले सरकार नाशिकसाठी देईल. चालू असणारी कामे देखील स्थगित करण्याचे काम महाविकास आघाडीने त्यांच्या काळात केले.आयटी हब असणाऱ्या पुण्यात आणि नाशिकसाठी आपण हायस्पीड ट्रेन सुरू करणार आहोत. नाशिक विमानतळ आपल्याची सरकारने सुरू केले आहे.”

“तुम्हाला काम करणारी लोक हवी आहेत की स्थगिती आणणारी लोक हवी आहेत? तर भाजपा आणि महायुती ही काम करणारी बाजू आहे. महायुतीने  राज्यातील प्रत्येक समाजासाठी काम केले आहे. जोवर महिला या आर्थिक, सामाजिक दृष्ट्या सक्षम होणार नाहीत, त्याशिवाय आपला देश विकसित भारत होणार नाही.”

कंपन्या बाहेर गेल्या हा ‘फेक नॅरेटिव्ह’….

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप वारंवार शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून केला जात आहे.  मात्र हा आरोप धादांत खोटा असून हे दोघे ‘फेक नेरेटिव्ह’ची फॅक्टरी आहे. गेल्या काही काळात असेही सांगितले गेले की हिंजवडीतील 36 कंपन्या बाहेर गेल्या याची मी माहिती घेतली. त्यानंतर असे दिसून आले महाविकास आघाडीच्या काळात 19 कंपन्यांनी आपले नवीन कॅम्पस सुरू केल. त्यांनी फक्त आपला विस्तार दुसरीकडे केला. पण तो विस्तार महाराष्ट्राच्या बाहेर  केला नाही. या  ‘फेक नेरेटिव्ह’ च्या फॅक्टरीला मी सांगू इच्छितो 2014 ते 2019 मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो .या काळात परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. 2020 -21 मध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर गेला. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. आज देशांतर्गत गुंतवणुकीची तुलना केल्यास कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र यांची गुंतवणूक 48 टक्के आहे.मात्र एकट्या महाराष्ट्राची गुंतवणुक 52 टक्के आहे. हे आकडे आरबीआयने जाहीर केलेले आहेत.

मायक्रोसॉफ्टमुळे ५० हजार नोकऱ्यांची संधी…

देवेंद्र फडणवीस म्हणाले खरे तर खरे तर महाराष्ट्राची ही प्रगती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगायला हवी होती. मात्र रोज उठून हेच नेते महाराष्ट्र मागे पडत असल्याच्या फेक नेरेटिव्हला सेट करतात. गुजरातची भोंगे लावून प्रसिद्धी करतात. आगामी काळात पुणे जिल्ह्यामध्ये ऑटोमोबाईल आणि ईव्ही इन्वेस्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. मायक्रोसॉफ्टने महाराष्ट्रात युनिट सुरू केले असून या माध्यमातून पन्नास हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांना येथे हिवाळी अधिवेशनातच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page