दिनांक 9 मार्च 2024 जाणून घेऊया आजच्या राशीभविष्य मधून‘या’ राशींवर कायम असते शनिदेवाची कृपा; वाचा राशीभविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात आणि मित्रांसह घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलघार्‍यांकडून लाभ होईल आणि त्यांचे सहकार्य मिळेल. अचानक धनलाभामुळं मनाची प्रसन्नता वाढेल. दूर राहणार्‍या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील. प्रवास – पर्यटनाचे बेत यशस्वीपणे आखाल.

▪️वृषभ :

आज चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूनं लागून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख – समाधान लाभेल. नवीन कार्याचं आयोजन हाती घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण कराल. दांपत्य जीवनात गोडी राहील. प्रकृती उत्तम राहील. धन आणि मान- सन्मान प्राप्त होतील. व्यापारी वर्गाला वसुली करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.

▪️मिथुन :

आज चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावं लागेल. आरोग्य बिघडल्यानं कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी – व्यवसायात सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्यानं मानसिक दृष्टया निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. विरोधकां बरोबर वाद – विवाद करणं उचित ठरणार नाही. वडिलांना त्रास होईल.

▪️कर्क :

आज चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अवैध काम आणि चोरी या सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक टंचाई जाणवेल. अशा वेळी मानसिक शांततेसाठी प्रयत्न करावेत.

▪️सिंह :

आज चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आपण मनोरंजन आणि हिंडण्या – फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडं आपला व्यवहार उदासीनच असेल. जोडीदाराची प्रकृती बिघडेल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास आनंददायी असणार नाही. व्यापारी वर्गाला भागीदारांशी जरा धैर्याने काम करावं लागेल. सार्वजनिक आणि सामाजिक जीवनात यश कमी प्रमाणात मिळेल.

▪️कन्या :

आज चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज कुटुंबात आनंद आणि उत्साहाचं वातावरण राहिल्यानं आपलं मन प्रसन्न राहील. स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील. व्यापार – व्यवसायात प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांच्याकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या समजतील.

▪️तूळ :

आज चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा यात भाग घेणं आपणास आवडेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. त्यांची प्रगती होईल. स्त्री मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रिय व्यक्तीच्या सहवासानं आनंद होईल. विचारांच्या आधिक्याने मन विचलित होईल. सामान्यतः शारीरिक आणि मानसिक उत्साहा बरोबरच आज सर्व कामे कराल.

▪️वृश्चिक :

आज चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल. शारीरिक स्वास्थ्य बिघडल्यानं आपण मानसिक दृष्टया बेचैन राहाल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्यानं मनास यातना होतील. स्थावर संपत्ती आणि वाहन इत्यादींच्या व्यवहाराशी निगडित कागदपत्रावर सही करताना सावध राहा. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. जलाशयापासून भीती राहील.

▪️धनू :

आज चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास गूढ आणि रहस्यमय विषयांची गोडी लागल्यानं त्या विषयात खोलवर उतरण्याचा आपण प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रकृती उत्तम राहील आणि मन प्रसन्न राहील. जवळपासचे प्रवास घडतील. मित्र आणि नातेवाईक याचा सुखद सहवास घडेल. नशिबाची साथ लाभेल. व्यापार – व्यवसायात प्रगती होईल.

▪️मकर :

आज चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. कुटुंबियांशी मतभेद होऊ नयेत म्हणून याची आवश्यकता आहे. विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावं लागेल. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. स्वास्थ्य साधारण राहील. उजव्या डोळ्यास त्रास होण्याची शक्यता आहे.

▪️कुंभ :

आज चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व दृष्टीनी चांगला आहे. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल. दांपत्य जीवनातील आनंद उपभोगू शकाल. भेटवस्तूंची प्राप्ती आणि धनप्राप्ती होईल. संपूर्ण दिवस प्रसन्न वातावरणात घालवू शकाल.

▪️मीन :

आज चंद्र कुंभ राशीस स्थित आहे. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा आणि पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. महत्वाची कागदपत्रे किंवा कोर्ट – कचेरीतील प्रकरणे या पासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. आजचा दिवस आर्थिक देवाण – घेवाणीसाठी अनुकूल नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page