ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.
*मेष (ARIES) :*
चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आज अती विचारानं मनावर ताण येईल. मन हळवे होईल. वाद-विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल. एखादा मानहानीचा प्रसंग उदभवेल. नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी येतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. एखाद्या स्त्रीमुळं नुकसान होण्याची शक्यता आहे.
*वृषभ (TAURUS) :*
चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. सुरूवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र आणि स्नेहीजनांच्या सहवासानं आनंदित व्हाल. व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. धनसंचय होऊ शकेल.
*मिथुन (GEMINI) :*
चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज आपले शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. दुपारनंतर आर्थिक नियोजनात काही चूक झाली असल्याचे वाटेल. आर्थिक देवाण-घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.
*कर्क (CANCER) :*
चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचं जाणवेल. नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्यानं अडचणीत येऊ शकाल. दुपारनंतर समस्या कमी होऊ लागतील. शारीरिक, मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. मनातील नकारात्मक विचार काढून टाकल्यास, कौटुंबिक वातावरण आनंदी होऊ शकेल. आर्थिक लाभ संभवतात.
*सिंह (LEO) :*
चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणानं मन चिंतीत होईल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. दुपारनंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. मन शांत होईल. कुटुंबियांच्या सहवासात रात्री भोजन घेऊ शकाल. आरोग्यात सुधारणा होईल. खर्च नियंत्रित ठेवावं लागतील.
*कन्या (VIRGO) :*
चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आज सकाळची वेळ आपणास आनंददायी आणि लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दुपारनंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. प्रकृतीच्या तक्रारी उदभवतील. वाद होण्याच्या शक्यतेमुळं बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.
*तूळ (LIBRA) :*
चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आज शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. धनप्राप्ती संभवते. पत्नी आणि संततीसंबंधित लाभ होतील. मित्रांच्या सहवासाने आनंद होईल. प्राप्तीत वाढ संभवते.
*वृश्चिक (SCORPIO) :*
चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज विरोधक व प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. नोकरी-व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात. दुपारनंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता वाटेल. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. शासकीय कामे पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात अनुकूलता लाभेल.
*धनू (SAGITTARIUS) :*
चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आज आपल्या संतापामुळं नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक, मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी-व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळं आपण चिंतीत व्हाल. प्रतिस्पर्धी आणि विरोधक ह्यांच्याशी वाद संभवतात. नवीन कार्यारंभात अडचणी निर्माण होतील. महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही.
*मकर (CAPRICORN) :*
चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास आणि मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. वाहनसौख्य व मान-सन्मान संभवतात. दुपारनंतर मात्र शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या तक्रारी उदभवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. काही ना काही कारणाने संताप वाढेल व त्यामुळं कुटुंबीय आणि सहकारी ह्यांचे मन दुखावेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील.
*कुंभ (AQUARIUS) :*
चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान-सन्मानात वाढ होईल. दुपारनंतर एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात आप्तेष्टांना सहभागी करून घेऊ शकाल.
*मीन (PISCES) :*
चंद्र आज मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रांच्या आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. दुपारनंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. काही कारणानं आपल्यातील रागीटपणा वाढेल. अशा वेळेस आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल. विरोधकांवर मात करू शकाल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील.