कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला मिळेल? कशी मिळेल? तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 13 फेब्रुवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ….
▪️मेष :
आज चंद्र मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. द्विधा मनामुळं ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका. शारीरिक आणि मानसिक बेचैनी राहील. मंगल कार्यावर पैसा खर्च होईल. विदेशातील स्नेह्यांकडून बातम्या प्राप्त होतील.
▪️वृषभ :
आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारी आणि मित्र याच्याकडून लाभ आणि सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल. पर्यटनाचे बेत आखाल. महिला वर्गाकडून लाभ होतील आणि मान-सन्मान मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संतती कडून आनंददायी बातम्या मिळतील.
▪️मिथुन :
आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक सौख्य मिळेल. नोकरी-व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असं वाटेल. वरिष्ठ प्रोत्साहन देतील. त्यामुळं आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. पित्याकडून लाभ होईल. सरकारी काम पूर्ण होण्यात अडचणी येणार नाहीत. दांपत्य जीवनात सुख, आनंद मिळेल.
▪️कर्क :
आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास यामुळं आपल्या आनंदात भर पडेल. कुटुंबियांसह चांगल्या प्रकारे वेळ जाईल. परदेशगमनाची इच्छा बाळगणारे, तसेच नोकरदारांना लाभ होण्याची शक्यता आहे.
▪️सिंह :
आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडं लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आज आपला संताप वाढल्याने आपले मन अशांत होईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आज व्यवसायात अडथळा येईल. परदेशातील आप्तांकडून खुषालीची बातमी मिळेल.
▪️कन्या :
आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी, प्रतिष्ठा लाभेल. वस्त्रे आणि अलंकाराची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. भागीदारांशी चांगले संबंध राहातील. पती – पत्नीतील दुरावा संपून जवळीक निर्माण होईल.
▪️तूळ :
आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. घरातील सुखा-समाधानाचं वातावरणांमुळे आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कामात यश प्राप्ती होईल. माता – पिताकडून काही चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
▪️वृश्चिक :
आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज शक्यतो प्रवासाचे आयोजन करू नये. आरोग्य विषयक चिंता निर्माण होईल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक चर्चा किंवा वादविवाद यात सहभागी न होणे हिताच राहील.
▪️धनू :
आपल्यासाठी चंद्र चौथा स्थानी असेल. आज जास्त संवेदनशीलते मुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळं मनात चलबिचल वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने पण दिवस चांगाल नाही. आईच्या तब्बेती विषयी विशेष खबरदारी घ्यावी लागेल. निद्रानाशाचा त्रास होईल. जलाशया पासून जपून राहणं हिताचे ठरेल.
▪️मकर :
आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहावं लागेल. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार-व्यवसायात लाभ होईल. शेअर – सट्ट्यातील गुंतवणूकीत लाभ होईल. मित्र, स्वकीय व भावंडे यांच्याशी चांगले मेतकूट जमेल. मनाची तगमग दूर होईल. विद्यार्थ्यांना प्राविण्य प्राप्त होईल.
▪️कुंभ :
आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळं कोणताही ठोस निर्णय आपण घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्यानं कुटुंबियांशी मतभेद होतील. मंगल कार्यावर खर्च होईल. प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नकारात्मक विचार दूर करा.
▪️मीन :
आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. नातलग, संबंधित आणि मित्र यांच्याशी भेट – संवाद घडतील. त्यांच्या समवेत बाहेर फिरायलाचा, जेवणासाठी जाण्याची संधी येईल.