भाजप नेते बाळ माने व अशोक मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेत दापोली संघ ठरला विजेता.

Spread the love

रत्नागिरी | जानेवारी १३, २०२४

रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख भाजप नेते बाळासाहेब माने व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य, माजी नगराध्यक्ष अशोकराव मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त, विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ, रत्नागिरी तसेच कबड्डी असोसिएशन व भाजपा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, भाजप नेते निलेश राणे प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत भाजपा नेते बाळासाहेब माने, अशोकराव मयेकर, माजी जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, भाजपा रत्नागिरी (द.) चे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष संयोग (दादा) दळी व विवेक सुर्वे, राजू मयेकर, परशुराम (दादा) ढेकणे, अमित विलणकर, बावा नाचणकर, मुन्ना खामकर, हेमंत शेट्ये, राजन फाळके, मंदार खंडकर आदी भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारोह संपन्न झाला.

स्पर्धेत अंतिम सामना अत्यंत रोमहर्षक व चुरशीचा झाला. सर्व क्रीडारसिकांनी भरभरून प्रतिसाद देत व असे ताकदवर सामने भरवल्यामुळे आयोजकांना धन्यवाद दिले. यावेळी संबोधन करताना “मा. खासदार निलेश राणे म्हणाले की मुंबईच्या धर्तीवर आपण आज तेवढ्याच दर्जाचे कबड्डी सामने रत्नागिरी मध्ये भरवले आहात याबाबत कौतुक वाटते.” गजानन संघर्ष दापोली यांनी विजेतेपदावर नाव कोरले. रोख ५१०००/- व झळाळता चषक प्रदान करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौवराण्यात आले तर द्वितीय क्रमांक दसपटी चिपळूण संघाला रोख २५०००/- व चषक देऊन गौवरवण्यात आले. तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या महापुरुष रत्नागिरी यांना रोख १५०००/- व चषक आणी चौथा क्रमांक जय हिंद जय आबा या संघाला रोख १००००/- चषक देऊन गौवण्यात आले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा नेतृत्व संकेत मयेकर यांनी अथक प्रयत्न केले तर विठ्ठल रखुमाई मंडळाचे कार्यकर्ते पराग हेळेकर, प्रवीण हेळेकर, भाई चव्हाण, साई टिकेकर, राजू तोडणकर, समीर तिवरेकर, मंदार मयेकर, मनोज फणसोपकर, वैभव हेळेकर, अवधूत शेट्ये, सुनील सावंत आदींनी मेहनत घेतली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page