भाजपचे संगमेश्वर दक्षिण तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांचा तालुक्यात झंझावात…

Spread the love

देवरूख- भाजपाच्या संगमेश्वर दक्षिण मंडलाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर रूपेश कदमांनी तालुक्यात झंझावात सुरू केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील भाजपामध्ये पक्षप्रवेशाची रीघ सुरू झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण रत्नागिरीत आले असता देवरूख परिसरातील अनेक युवा कार्यकर्ते भाजपामध्ये सामील झाले. याबद्दल विचारले असता कदम म्हणाले की, देव श्री मार्लेश्वराची कृपा, माझी आई सौ. रश्मी कदमांचा संपर्क, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व माझे मार्गदर्शक श्री. राजेशजी सावंत साहेब यांचे पाठबळ व चिपळूण संगमेश्वरचे विधानसभा निवडणूक प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक प्रमोदजी अधटराव यांनी गेल्या पाच सहा वर्षात संगमेश्वर तालुक्यात केलेला जनसंपर्क यामुळे हे यश आता नजरेत भरू लागले आहे. लोकांना आता केवळ भाजपाच खरा विकास करू शकते याची खात्री झाली आहे. सामान्य माणूस मोठ्या आशेने भाजपात सामील होत आहे.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सर्वसमावेशक धोरण, विकासाची दूरदृष्टी आणि राज्य पातळीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी उभे केलेले संघटनात्मक भक्कम जाळे आणि विकासाचा महापूर यावर खूश होऊन आता भाजपाचे बळ वाढू लागले आहे.
पक्षाने दिलेला आदेश पाळत आत्ता वाटचाल सुरू केली आहे. माझे तरूण सहकारी उत्तर मंडलाचे अध्यक्ष विनोद म्हस्के, दोन्ही मंडलांच्या महिला मोर्चाच्या सर्वच प्रतिनिधी आणि विशेषत: भाजयुमोचे दक्षिण मंडलाध्यक्ष प्रथमेश धामणस्कर, उत्तर मंडलाध्यक्ष स्वप्नील सुर्वे आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांचीदेखील मोलाची साथ मिळते आहे. नव्यांचा जोश, उत्साह आणि जुन्यांची भक्कम साथ आणि मार्गदर्शन यामुळे यापुढे ताकुक्यात भाजपाला प्रथम क्रमांकावर आणण्याचा चंग बांधला आहे. एकंदरीतच मध्यंतरीच्या काळात मरगळ आलेला संगमेश्वर तालुक्यातील भाजपा आता कात टाकत उत्साहाने सळसळताना दिसू लागला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page