
संगमेश्वर /वार्ताहर- सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित संघाचे अध्यक्ष सौ प्रिया सावंत इतर सर्व पदाधिकारी, संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या माननीय पोलीस निरीक्षक सुतार मॅडम, प्रियदर्शनी भगिनी मंडळाच्या फाउंडर मेंबर माधवी भिडे, पैसा फंड च्या शिक्षिका सौ.अर्चिता ( अमृता ) कोकाटे मॅडम, सामाजिक मंच संगमेश्वर संघाचे अध्यक्ष श्री संजय शिंदे यांचे प्रथम गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून झाली. दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली.
उमेद अंतर्गत घे भरारी ग्राम संघाच्या सर्व बचत गटाचे अहवाल वाचन करण्यात आले. महिला कशाप्रकारे प्रगती करीत आहेत याचा आढावा घेण्यात आला. संघाच्या कोषाध्यक्ष आर्या मयेकर, सचिव अनुश्री शेट्ये, बँक सखी सानिका कदम, सीआरपी दीप्ती मूरकर, मनाली सुर्वे, स्वरा सुर्वे यांनी बचत गटाची कामे, होणारे व्यवहार, नियोजन व्यवसाय याविषयी सर्वांना माहिती दिली.
दरवर्षीप्रमाणे होणारे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बचत गटाच्या 35 महिलांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. श्री गणेश वंदना, श्रीराम गीत नृत्य, श्रीकृष्ण नृत्य, पालखी नृत्य, पारंपारिक जाखडी नृत्य, शेतकरी नृत्य, मंगळागौर, सोलो डान्स आणि सर्वांचं मन वेधून घेणारा असा आगळावेगळा भुताचा डान्स ही महिलांनी सादर केला.

कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ महिलांचाही सहभाग होता. कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन पैसा फंड च्या शिक्षिका अमृता कोकाटे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या दरम्यान सामाजिक मंच संगमेश्वर यांच्या वतीने संघाचे अध्यक्ष श्री.संजय धोंडू शिंदे राहणार कोंडअसर्डे यांच्या शुभहस्ते घे भरारी संघाचे अध्यक्षा सौ.प्रिया प्रभाकर सावंत यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच सामाजिक कार्यकर्त्यां सौ.अर्चिता (अमृता) राहुल कोकाटे (शेट्ये )यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच सामाजिक मंच व प्रियदर्शनी भगिनी मंडळाच्या फाउंडर मेंबर सौ. माधवी मनोहर भिडे महिला दक्षता कमिटी अध्यक्ष यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार 2024 हा प्राप्त झाल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ यावेळी उपस्थित जनसमुदाय व कमिटी यांच्या समक्ष देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
संगमेश्वरच्या महिला अशा प्रकारे सक्षम होत आहेत, पुढे जात आहेत ही संगमेश्वर गावासाठी अभिमानास्पद बाब आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने माननीय पोलीस निरीक्षक सौ.स्मिता सुतार मॅडम, बीट अंमलदार प्रशांत शिंदे, पोलीस अंमलदार सचिन कामेरकर व महिला पोलीस, पोलीस मित्र आकाश शेट्ये, पोलीस पाटील अंगराज कोळवणकर,कार्यक्रमासाठी आठवडा बाजार येथील पैसा फंड शाळेची जागा देण्यात आली त्यासाठी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष श्री.अनिल शेट्ये, पत्रकार या सर्वांचे सहकार्य लाभले यासाठी त्यांचे आभार मानण्यात आले. म्युझिक सिस्टीम श्री.प्रमोद सुर्वे आणि पावस्कर यांचे आभार मानण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अमृता कोकाटे, सौ योगिनी डोंगरे आणि सौ.अनुश्री शेट्ये यांनी केले.