काळजी घ्या! 6 तासांपेक्षा कमी झोप खराब करू शकते तुमचं आरोग्य; ‘या’ आजारांचा वाढतो धोका…..

Spread the love

▪️उत्तम आहार आणि चांगल्या जीवनशैलीसोबतच चांगली झोप देखील आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 7-8 तासांची झोप आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं आरोग्य तज्ज्ञ अनेकदा सांगतात. यापेक्षा कमी झोप घेतल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात कामाचा व्याप इतका वाढलाय की झोपण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही.

▪️आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 7-8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झालं आहे की कमी झोपेमुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात. जे लोक कमी झोपतात किंवा ज्यांना कमी झोप येते, त्यांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

➡️जर तुम्ही तुमच्या शरीराला पाहिजे तेवढी विश्रांती दिली नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं…

🔹️वजन वाढण्याची समस्या…

जर एखादी व्यक्ती 6 तासांपेक्षा कमी झोपली तर त्याला अनेक आजार होतात. उदाहरणार्थ, लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. झोप कमी झाल्यास शरीरात कॉर्टिसॉल आणि लेप्टिन नावाच्या हार्मोन्सची पातळी वाढते. त्यामुळे जास्त भूक लागते आणि यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह होतो.

🔹️कमकुवत प्रतिकारशक्ती…

शरीराला आवश्यक तेवढी झोप न मिळाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे बॅक्टेरिया तसेच संसर्गाशी लढण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम होईल. ज्यांची खाण्याची सवयी, झोप आणि जीवनशैली चांगली असते. त्याची रोगप्रतिकारशक्तीही व्यवस्थित काम करते. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर ते झोपेच्या कमतरतेमुळे असू शकतं.

🔹️स्मरणशक्तीवर परिणाम…

झोप कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात सूज येऊ लागते हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झालं आहे. हे घडते कारण धोकादायक प्रोटीन शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत. ज्याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर होतो. त्यामुळे मेंदूशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page