वाशिष्ठी डेअरीतर्फे कृषी व पशू प्रदर्शन, कृषी महोत्सव २०२४ मध्ये ७ रोजी पाककला स्पर्धा..

Spread the love

वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची माहिती

चिपळूण : महिलांमधील पाककला कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट्सतर्फे दिनांक ५ ते ७ जानेवारी दरम्यानच्या कृषी महोत्सवात दिनांक ७ रोजी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांनी दिली.

वाशिष्टी डेअरी प्रकल्पातर्फे दिनांक ५ ते ७ जानेवारी रोजी चिपळूणमध्ये ”वाशिष्ठी डेअरी कृषी व पशु प्रदर्शन कृषी महोत्सव २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे. सदरील महोत्सव चिपळूण नागरी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या शेजारील बहादूरशेखनाका येथील चिपळूण नगरपरिषदेच्या सावरकर मैदानात सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत असणार आहे. या महोत्सवात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उत्कृष्ट पशुधन स्पर्धेबरोबरच पाककला स्पर्धा देखील होणार आहे.


पाककलेत महिलांची निपुणता असतेच पण या कलेच्या माध्यमातून अनेक प्रयोग करताना विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचा काही महिला प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी वाशिष्ठी डेअरी तर्फे पाककला स्पर्धा दिनांक ७ जानेवारी दुपारी १२ ते ३ या दरम्यान चिपळूण नगर परिषदेच्या बहादूरशेखनाका येथील सावरकर मैदानात होणार आहे.

या स्पर्धेत रेसिपी बनविण्यासाठी महिलांनी साहित्य स्वतःचे आणायचे आहे. तर यामध्ये वाशिष्ठी डेअरीच्या दही, पनीर, दूध, तूप , ताक, मसाला ताक, श्रीखंड, आम्रखंड, लस्सी, मँगोलस्सी, पेढा, खवा, बासुंदी आदी पदार्थांचा वापर रेसिपीनुसार करायचा आहे. या स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस व प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी सौ. स्वप्ना यादव मो- ९४२२६६११९७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page