
ठाणे : निलेश घाग ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील नऊशे पैकी सातशे सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीची कामे सुरू असून त्याचबरोबर राज्य शासनाकडून मिळालेल्या ५ कोटी ४५ लाखांच्या निधीतून ठाणे महापालिका शहरातील प्रमुख रस्त्यांसह झोपडपट्टी भागांमध्ये कंटेनर शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. एकूण ३० ठिकाणी सुरू असलेली ही कामे अंतिम टप्प्यात आहेत.

त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांसह झोपडपट्टी भागांमध्ये ३० कंटेनर शौचालयांची उभारणी करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु पालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी नसल्यामुळे या प्रकल्पा साठीही राज्य सरकारने ५ कोटी ४५ लाख ६७ हजार ३०० रुपयांचा निधी मंजुर केला होता. हा निधी प्राप्त होताच ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील ३० ठिकाणी कंटेनर शौचालय उभारणीचे काम हाती घेतले. या शौचालयांच्या ठिकाणी पाण्याची टाकी बसविण्यात आली असून त्याद्वारे शौचालयांमध्ये सतत पाणी उपलब्ध होणार आहे.
सध्या ठाणे वागळे इस्टेट येथील रामनगर भागात एक शौचालय सुरू झाले आहे तर, उर्वरित शौचालयांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. येत्या काही महिन्यांत काम पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
कोणत्या प्रभाग समिती अंतर्गत होणार कंटेनर शौचालय पहा सविस्तर….
प्रभाग समिती – शौचालये संख्या – युनीट संख्या
नौपाडा-कोपरी – ४ – २४ माजिवाडा-मानपाडा – ४ – २८ वागळे इस्टेट – ६ – ३२ वर्तकनगर – ३ – २० लोकमान्य-सावरकर – ४ – २४ कळवा – २ – २०
मुंब्रा – ४ – १६ दिवा – ३ – १८ एकूण – ३० – १८२
जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात


