MP Exit Polls Result 2023 : पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यांपैकी मध्य प्रदेशात काँग्रेसची हवा असल्याचं सांगितलं जात होतं. पण निकाल भलताच लागू शकतो. कारण भाजप आणि काँग्रेसमध्ये इथं काँटे की टक्कर होण्याचा अंदाज एक्झट पोल्सनं वर्तवला आहे.
मध्य प्रदेशात एकूण जागा २३० आहेत. यांपैकी बहुमताचा आकडा ११६ आहे. एक्झिट पोलमधून बहुतांश ठिकाणी काँग्रेस बहुमताचा आकडा गाठू शकते असे अंदाज आहेत. पण काही पोल्समध्ये भाजप या बहुमताच्या जवळ असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं मध्य प्रदेशातील निकाल हे रंजक असण्याची शक्यता आहे.
▪️रिपब्लिक-मॅट्रिज
काँग्रेस – ९७-१०७
भाजपा – ११८- १३०
इतर – ०-२
▪️जन की बात
काँग्रेस – १०२-१२५
भाजपा- १००-१२३
इतर – ०-५
▪️टीव्ही ९ भारतवर्ष
काँग्रेस- १११-१२१
भाजप-१०६-११६
इतर – ०-६