ठाणे : निलेश घाग दिव्यातील जनतेला पाणी मिळत नसल्यामुळे दिवा प्रभाग समितीवर पाण्यासाठी हल्लाबोल मोर्चा…
दिवा शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. मागील पाच वर्षात येथील पाणी टंचाईवर सत्ताधारी व प्रशासन ठोस उपाययोजना करू शकले नाही.ज्या पद्धतीने ठाणे शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळते,त्याच पद्धतीने दिवा शहरातील नागरिकांना किमान पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पाणी हक्क मोर्चा काढणार आहोत.
221 कोटी रुपये खर्च करून दिव्यातील पाणी समस्या दूर व्हावी यासाठी 7 जून 2023 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले परंतु उद्घाटन केल्यापासून आजपर्यंत लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही पाणीप्रश्न सुटेल असे दर पाच वर्षांनी येथील सत्ताधारी सांगत होते, मात्र प्रत्यक्षात दिवा शहराचा आपण दौरा केला तर येथील नागरिकांना गरजेपुरते सुद्धा पाणी मिळत नाही हे.अनेक भागात दोन ते तीन दिवसानी चार-पाच हंडे पाणी मिळते.लोकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते,येथील नागरिक हे सामान्य कुटुंबातील आहेत.अनेकांची आर्थिक स्थिती बेताची आहे,अशा स्थितीत महिन्याला टँकर साठी लोकांनी 2 ते 3 हजार रुपये कुठून आणायचे? जी लोकं टँकरने पाणी विकत घेऊ शकतात ती लोकं पालिकेचे बिल भरू शकणार नाहीत का?येथील जनतेला पाणी द्यायचे नाही हाच सत्ताधारी लोकांचा उद्देश दिसतो. दिव्याच्या नागरिकांना ठाण्यातील नागरिकांप्रमाणे मुबलक पाणी दररोज मिळावं या मागणीसाठी दिव्यातील नागरिकांच्या सहकार्याने दि 1डिसेंबर2023 सकाळी 11 वाजता दिव्यातील तमाम माता भगिनी दिवा प्रभाग समिती येथे धडक मोर्चा काढणार आहेत.
जाहिरात