
नागपूर- काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये नितीन राऊत थोडक्यात बचावले आहेत. त्यांना कोणतीही इजा अथवा दुखापत झाली नाही. बुधवारी रात्री उशीरा हा अपघात घडला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या अपघाताची माहिती मिळताच नितीन राऊत यांच्या समर्थकांनी घटनास्थळी गर्दी केली.
नागपूरमधील ऑटोमोटिव्ह चौकात बुधवारी रात्री उशीरा एका ट्रकनं नितीन राऊत यांच्या गाडीला धडक मारली. या अपघातात नितीन राऊत थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला होता, या अपघातात राऊत यांच्या वाहनाचे थोडे नुकसान झालेय. अपघातात राऊत सुखरूप असून कपिल नगर पोलिसांनी यासंदर्भात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राऊत हे काल रात्री प्रचार सभा आटपून घरी जात होते. त्यावेळी नागपुरातील ऑटोमोटिव्ह चौकात त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारमध्ये बसलेल्या नितीन राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जोरदार धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच नितीन राऊत यांच्या समर्थकांनी घटनास्थळी गर्दी केली. समर्थकांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपुस करण्यात आली. या अपघातात नितीन राऊत हे थोडक्यात बचावले आहेत. ते एकदम सुखरूप असून कारला धडक देणाऱ्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.