भारताचा दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय; रंगतदार झालेल्या सामन्यात अक्षर पटेलने घेतलेला अफलातून झेल ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट…

Spread the love

सेंच्युरियन- टीम इंडियाने तिसऱ्या टी-२० सामन्यात साऊथ आफ्रिका संघाचा ११ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा बॅटींगला उतरलेल्या टीम इंडियाने २० ओव्हरमध्ये २१९-६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाला २० ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी २०८-७ धावांवरच रोखलं.

शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्याध्ये टीम इंडियाने विजय मिळवला पण सामना आधी अडकून पडला होता. आफ्रिकेचे सुरूवातीचे फलंदाज चांगली सुरूवात करून माघारी परतले होते. त्यानंतर क्लासेन, मिलर आणि जान्सेन यांनी आक्रमक खेळ करत सामना खेचून आणायला सुरूवात केली होती. मैदान लहान असल्याने षटकार जात होते, फटकेबाजी सुरू असताना टीम इंडियाच्या एका खेळाडूने अफलातून झेल घेत सामन्याला कलाटणी दिली.

रायन रिकेल्टन २० धावा, रीझा हेंड्रिक्स २१ धावा, एडन मार्क्रम २९ धावा, ट्रिस्टन स्टब्स १२ धावा करून माघारी परतले. सर्वांनी दमदार सुरूवात केली होती पण मोठ्या खेळीमध्ये कोणालाच रूपांतर करता आले नाही. विकेटकीपर हेनरिक क्लासेन मैदानावर एकटा टीम इंडियाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत होता. जागेवर उभा राहून पायही न हलवता षटकार मारत होता. दुसऱ्या बाजूला डेव्हिड मिलर उभा होता. मिलर सेट होऊ लागला होता. याआधी मिलरने असे अनेक सामने आफ्रिकेला जिंकून दिले आहेत. मिलरने सुरूवातच केली होती, १ चौकार आणि १ षटकार मारला होता. क्सासेन आणि मिलरमुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण झाला होता.

सामन्याची १६ ओव्हर हार्दिक पंड्या टाकत होता. पाचव्या चेंडूवर डेव्हिड मिलर याने डीप मिड विकेटला हवेत जोरात फटका खेळला. सर्वांना वाटलं की आता हा सिक्स असणार पण सीमारेषेवर अक्षर पटेल बुरजासारखा उभा होता. अक्षरने योग्यवेळी उडी मारत पर्फेक्ट टायमिंग साधला आणि अफलातून कॅच घेतला. मिलर १८ धावांवर आऊट झाला. या कॅचनंतर आफ्रिकेच्या चाहत्यांनाहीही टाळ्यांचा कडकडाट करत त्याचे कौतुक केले. त्यानंतर जान्सेस याने १६ चेंडूत अर्धशतक करत सामना खेचून आणण्याचा प्रयत्न केला होता पण तो काही यशस्वी ठरला नाही. जर मिलर आणि क्लासेन हे आणखी १ ते २ ओव्हर टिकले असते तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page