३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा ‘ही’ आठ कामे करा…

Spread the love

मुंबई :- २०२३ हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. कॅलेंडर वर्षाचा शेवटचा महिना असल्यानं, अनेक आर्थिक कामांची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. यामध्ये विशेष फिक्स्ड डिपॉझिट प्रोग्राम, होम लोनवरील आकर्षक ऑफर आणि इतर अनेक आर्थिक बाबींचा समावेश आहे. येथे आम्ही तुम्हाला अशा आठ आर्थिक कामांबद्दल सांगत आहोत जी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे.
आयटीआर – आर्थिक वर्ष २०२२-२३ म्हणजेच मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ होती. जे या तारखेपर्यंत आयटीआर दाखल करू शकले नाहीत ते अजूनही ते दाखल करू शकतात. याला विलंबित आयटीआर म्हणतात. त्यासाठी विलंब शुल्क आणि दंड भरावा लागतो. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी बिलेटेड आयटीआर भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ आहे.
बँक लॉकर – रिझर्व्ह बँकेनं सुधारित लॉकर करारांची टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. तुम्ही ३१ डिसेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी सुधारित बँक लॉकर अॅग्रीमेंट सबमिट केले असल्यास, तुम्हाला अपडेट केलेला ॲग्रीमेंट सबमिट करणं आवश्यक असू शकतं.
म्युच्युअल फंड नॉमिनेशन – तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत एखाद्याला नॉमिनी ठेवावं लागेल. तसं न केल्यास तुमचं म्युच्युअल फंड खाते गोठवलं जाईल आणि तुम्ही त्यातून पैसे काढू शकणार नाही. डीमॅट खातेदारानंही हे करणं आवश्यक आहे. नॉमिनी बनवण्याचा पर्याय यापूर्वीही होता पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला त्याच्या गुंतवणुकीचा लाभ मिळावा यासाठी ही सुविधा आवश्यक करण्यात आली आहे. यासोबतच नंतर ट्रान्सफरही सोपं होतं.
युपीआय आयडी – नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमला एका वर्षापेक्षा अधिक काळापर्यंत निष्क्रिय असलेले युपीआय आयडी बंद करण्यास सांगितले आहेत. यासाठी ३१ डिसेंबर २०२३ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडर आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना अशी निष्क्रिय खाती ३१ डिसेंबरपर्यंत बंद करण्यास सांगण्यात आलेय. NPCI कडून असेही सांगण्यात आले आहे की अशी निष्क्रिय खाती पुन्हा सुरू केली जाऊ शकतात परंतु यासाठी किमान एक व्यवहार करणं आवश्यक आहे.
एफडी – IDBI बँकेनं २ कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक रक्कम असलेल्या फिक्स्ड डिपॉझिट स्कीमच्या व्याजदरांमध्ये बदल केले आहेत. तसंच, बँकेनं आपल्या स्पेशल डिपॉझिट स्कीममधील अमृत महोत्सव एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. यासह गुंतवणूकदारांना या योजनांद्वारे भरघोस परतावा मिळवण्याची संधी आहे. यामध्ये ३७५ दिवस आणि ४४४ दिवसांच्या एफडीचा समावेश आहे. या एफडी स्कीमवर बँक सर्वाधिक व्याज देत आहे.
एसबीआय होम लोन – जर तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे एसबीआयकडून स्वस्त दरात गृहकर्ज मिळवण्याची शेवटची संधी आहे. बँकेची विशेष होमलोन ऑफर डिसेंबरमध्ये संपणार आहे. या अंतर्गत, सिबिल स्कोअरच्या आधारे गृहकर्जाच्या सामान्य व्याजदरावर ०.६५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. ही ऑफर फक्त ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वैध आहे.
विशेष एफडी – सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेनं त्यांच्या विशेष एफडीची तारीख वाढवली आहे. बँकेनं इंड सुपर ४०० आणि इंड सुप्रीम ३०० डेजचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवली आहे. बँक या योजनांवर सर्वाधिक व्याज देत आहे. इंड सुप्रीममध्ये, बँक सर्वसामान्य नागरिकांना ७.०५ टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के व्याज मिळत आहे आणि अति ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक ७.८० टक्के व्याज मिळत आहे.
एसबीआय अमृत कलश – SBI च्या विशेष एफडी स्कीम एसबीआय अमृत कलश योजनेची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपत आहे. या ४०० दिवसांच्या एफडी योजनेवर सर्वाधिक ७.६० टक्के व्याजदर देण्यात येत आहे. एसबीआय अमृत कलश योजनेअंतर्गत, ग्राहकांना मुदतपूर्तीवर व्याजाचे पैसे मिळतात. बँक टीडीएसची रक्कम कापते आणि व्याजाची रक्कम एफडी खात्यातच जमा करते. या योजनेत गुंतवणूक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर कर्जाची सुविधा देखील मिळते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page