
रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी पोलीस दलाकडून पोलीस मुख्यालय याठिकाणी पोलीस स्मृती दिन-२०२५ साजरा करण्यात आला.
दि. २१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी लडाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी पोलीस दलातील १० जवान गस्त घालीत असताना दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांचेवर अचानक केलेल्या हल्ल्याला कडवे आव्हान देत शेवटच्या क्षणापर्यत झुंज दिली आणि ते वीरगतीला प्राप्त झाले. या घटनेमुळे संपूर्ण भारतभर दुःखाची छाया पसरली वीर जवानांनी दाखवलिल्या व अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फुर्ती मिळावी तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्टेची जाणीव व्हावी म्हणून शहिद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभर पोलीस हुतात्मा दिन या नावाने पाळला जातो.
रत्नागिरी पोलीस दलाकडून दि. ०१/०९/२०२४ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीमध्ये भारतातील विविध पोलीस दलातील एकूण १९१ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य पार पाडीत असताना, आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हुतात्मांचे स्मरणार्थ मंगळवार, दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०८.०० वा. पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथे शहीद पोलीस जवानांना श्रध्दांजली देवून स्मरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला मा.ना. श्री. डॉ. उदय स्वरुपा रविंद्र सामंत, मंत्री, उदयोग, मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा तसेच कोस्टगार्ड कमाउंट श्री. रोशन लाल, शैलेश गुप्ता, कस्टम विभागाचे अॅसीस्टंट कमिशनर श्री. संदीप कृष्णा हे उपस्थित होते. प्रथम प्रमुख पाहुणे मा.ना. श्री. डॉ. उदय स्वरुपा रविंद्र सामंत यांनी श्रध्दाजली संदेश वाचून दाखविला. त्यानंतर सदर कार्यक्रमास सुरुवात होवून, प्रमुख पाहूणे मा.ना. श्री. डॉ. उदय स्वरुपा रविंद्र सामंत, तसेच कोस्टगार्ड कमाउंट श्री. रोशन लाल, शैलेश गुप्ता, कस्टम विभागाचे अॅसीस्टंट कमिशनर श्री. संदीप कृष्णा, पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन, श्रध्दांजली देण्यात आली.
सदर कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा, श्री. सुरेश कदम, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अश्वनाथ खेडकर, राखीव पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र कुळसंगे, सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता सुतार व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*





