धामणीत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी..

Spread the love

परेश देवरुखकर /संगमेश्वर /19 फेब्रुवारी- प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमाची रणधुरंधर क्षत्रिय कुलवंतस, सिंहासनाधीश्वर , महाराजधिराज महाराज श्रीमंत श्री योगीराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी रोजी धामणी तालुका संगमेश्वर येथे शिवगर्जना मित्र मंडळ धामणी गोळवली यांच्यावतीने छत्रपती शिवरायांच्या जयंतीला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

एक शक्तिशाली नौदल तयार करणे आणि कल्याणास प्रोत्साहन देणारे न्याय आणि नागरी शासन स्थापित करणे हे ज्यांच्या कारकिर्दीत चिन्हांकित होते. ज्यांना धर्माबद्दल आदर आणि आक्रमणापासून आपल्या भूमीचे करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच “छत्रपतीं” किंवा “राजांचा राजा” ही पदवी मिळाली. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना सकाळी ९ वाजता पुष्पहार, दीप प्रज्वलन, पूजन, शिवरायांची आरती करून जयंतीला प्रारंभ झाला. शिवरायांवर अपार प्रेम असणारे धामणी गोळवली येथील ही शिवभक्तांचे जयंती साजरी करण्याचे दुसरे वर्ष असून आजची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली. आज दिवसभरात धामणी ते कसबा भगवामय स्वरूपात गाड्यानी आणि रॅली काढणें . महिलांचे लेझीम पथक, सायंकाळी शिवरायांवर आधारित आरती, पोवाडे, शिवचरित्र, महाराष्ट्र गीत, अशा असंख्य गीत गायनांने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.

शिवरायांची स्वयम शिस्त, जिजाऊंचे संस्कार, मावळ्यांप्रती असणारे प्रेम, समाजाला सन्मानानं जगवणे, अन्याय सहन न करणे, जातीभेद न मानने आधी विचारांची रुजवणूक शिवगर्जना मित्र मंडळ मनापासून करत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे व lत्यांचे सहकारी पोलीस वर्गाने या कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी श्रद्धा हॉटेलचे संचालक प्रभाकर घाणेकर, प्रणव वाकणकर, पोलीस पाटील आप्पा पाध्ये, हरिश्चंद्र गुरव, मंगेश बाणे, मंगेश महाडीक, सिद्धेश खातू सरपंच संतोष काणेकर, उपसरपंच संगम पवार डॉ. अमित ताठरे, मंदार पाष्टे, प्रथमेश घाणेकर अमोल गुरव, अजित कोळवणकर, प्रकाश घाणेकर उमेश लिंगायत, परेश देवरुखकर, रोशन पास्टे, प्रणव कोळवणकर प्रशांत शिवलकर, प्रकाश पास्टे, इत्यादी परिश्रम या कार्यक्रमासाठी घेत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page