संंगमेश्वर येथे सिमेंट मिक्सर ट्रक अचानक पडला बंद; मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Spread the love

संंगमेश्वर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस क्रांती सावंत यांनी सोडवली वाहतुक कोंडी

संगमेश्वर- मुंबई-गोवा महामार्गावरील संंगमेश्वर बसस्थानकाजवळ आज मंगळवारी दुपारच्या वेळेस सिमेंट मिक्सर ट्रक अचानक बंद पडल्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहतुक काहीकाळासाठी थांबली होती. यावेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र महामार्गावर ड्युटीवर असणाऱ्या संंगमेश्वर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस क्रांती सावंत यांनी एक-एक वाहन पुढे सोडत वाहतुक कोंडी क्षणार्धात सोडवली.

सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असून संगमेश्वर बसस्थानकाजवळ उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथून महामार्गावरची वाहतुक धिम्या गतीने सुरू असते. अशातच मंगळवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास बसस्थानकापासून काही अंतरावर चढावात सिमेंट मिक्सर ट्रक अचानक बंद पडला. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतुक खोळंबली होती. वाहतुक खोळंबल्याने दोन्ही बाजूला वाहनांची सुमारे १ किमी अंतरापर्यंत रांग लागली होती.

एकीकडे संंगमेश्वर बसस्थानकाजवळ उड्डाणपूलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुक अत्यंत धिम्या गतीने सुरू असताना त्यात भर म्हणून कि काय संंगमेश्वर बसस्थानकाजवळ सिमेंट मिक्सर ट्रक बंद पडल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. मात्र महामार्गावर ड्युटीवर असणाऱ्या महिला पोलीस क्रांती सावंत यांनी भर उन्हात उभे राहून ही वाहतुक कोंडी सोडवली. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील संंगमेश्वर बसस्थानकाजवळ उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूलाचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page