रत्नागिरी- वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून आशा सेविकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यासाठी लांजा तालुक्यातील जावडे येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जावडे येथे ६ जानेवारी रोजी हे आशा सेविकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आशा सेविका याना आरोग्य क्षेत्रातील नवनवीन बदलाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्या माध्यमातून ग्रामीण आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी तसेच त्यातून ग्रामीण भागापर्यंत अत्याधुनिक आरोग्य सेवेबद्दल माहिती पोहोचून त्याचा लाभ सामान्य जनतेला व्हावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत सोने, गट प्रवर्तक श्रीमती एन एन दीक्षित, मुख्यालय परिचारिका सरिता विश्वनाथ शेलार, एलइहव्ही प्रज्ञा विश्वजित कांबळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनघा अनंत कदम उपस्थित होते. तर धन्वंतरी रुग्णालयाकडून अश्विनी सिस्टर, ऐश्वर्या सिस्टर, रुशिका सिस्टर उपस्थित होते.