चिपळूणमध्ये दीड लाखाची लाच स्विकारताना सरकारी वकिलाला रंगेहाथ पकडले; रत्नागिरी जिल्ह्यात उडाली एकच खळबळ…

Spread the love

चिपळूण- आरोपीची उलट तपासणी न करण्यासाठी लाच मागितल्याने खेडमधील सरकारी वकिलाला चिपळूणमध्ये लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी यांना तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी ताब्यात घेतले. काल संध्याकाळी चिपळूण येथील ओयासीस हॉटेल येथे दिनांक गुरुवारी १९.१७ वाजता रंगेहाथ पकडण्यात आलेले असून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता.खेड, जि. रत्नागिरी यांनी ५,००,००० रुपयांची मागणी केलेली लाच रक्कम होती आणि स्वीकारलेली लाच रक्कम १,५०,००० रुपये होती.

याबाबत सविस्तर असे की, यातील तक्रारदार यांनी घरडा कंपनीच्या केसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वर्ग १, खेड यांचे न्यायालयात वकीलपत्र घेतलेले आहे. सरकार पक्षाच्यावतीने सदरची केस श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता हे पाहात होते. दिनांक २६ डिसेंबर २०२४ व दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक राजेश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे साक्षीदारांना शिकवणार नाही, तुमची केस कशी सुटेल, असे प्रयत्न करेन, जास्त उलट तपास न घेता महत्वाचे मुद्दे वगळून आरोपी निर्दोष कसे सुटतील व केस लवकर संपवायला मदत करण्यासाठी ५,००,००० रुपयांची मागणी करुन त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १,५०,००० रू. स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झालेले होते. त्यानंतर दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी सापळ्याचे आयोजन करुन लोकसेवक राजेश जाधव यांना तक्रारदार यांच्याकडून १,५०,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे.

यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

१) मा.श्री. शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.

२)मा.श्री. संजय गोवीळकर अपर पोलीस अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.

३)मा.श्री. गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.

४) मा.श्री.सुहास शिंद्र, अपर पोलीस अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.

५)मा. श्री अविनाश पाटील, पोलीस अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्यूरो, रत्नागिरी

अँन्टी करप्शन ब्युरो, रत्नागिरी तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही शासकिय अधिकारी/कर्मचारी किंवा त्याचे वतीने साजगी इसम लाचेची मागणी करीत असतील तर कृपया अँन्टी करप्शन ब्युरो, रत्नागिरी कार्यालयाशी खालील कमांकावर संपर्क साधावा.

टोल फ्री क्र

दूरध्वनी क्र:-१०६४

:-02352/222893, मोबाईल क्रमांक 7507417072,7774097874

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page