
चिपळूण- चिपळूण येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयच्या सांस्कृतिक विभागाने मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सव २०२४ च्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये रत्नागिरीच्या विभागामधून डीबीजे महाविद्यालयाचे १८ कलाप्रकार मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीत दाखल झाले होते. तर पाच कलाप्रकार थेट अंतिम फेरीत सादर करण्यात आले होते. २७ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर या कालावधीत मुंबई विद्यापीठ आयोजित या स्पर्धेत डीबीजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त झाले.
श्रीयांक पेंढारी या विद्यार्थ्यांला मराठी एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेता उत्तेजनार्थ हे पारितोषिक प्राप्त झाले. कुमारी सिद्धी कांबरे या विद्यार्थिनी एकपात्री अभिनय- मराठी आणि हिंदी एकांकिका साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उत्तेजनार्थ अशी दोन पारितोषिके मिळाली. मूक अभिनय या कलाप्रकारात संस्कार लोहार, अथर्व भेकरे, अतिष तांबे, पारस शिगवण, श्रेयस शिंदे आणि आर्यन शिर्के हे विद्यार्थी सहभागी झाले होते. आणि या कलाप्रकारासाठी विद्यापीठ स्थरावर कांस्यपदक प्राप्त झाले. मराठी स्किट या कलाप्रकारात डी. बी. जे. महाविद्यालयाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते याही वर्षी विद्यार्थ्यांनी ही परंपरा कायम ठेवत सुवर्णपदक पटकावले मराठी स्कीट कला प्रकारात अतिष तांबे, श्रीयांक पेंढारी, संस्कार लोहार, सिद्धी कांबळे आणि पारस शिगवण अथर्व भेकरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सुरवाद्य या कला प्रकारात कु. मानस साखरपेकर या विद्यार्थ्याने कास्यपदक मिळवले.
ललित कला प्रकारात महाविद्यालयाने यावर्षी चमकदार कामगिरी केली. महाविद्यालयाचा कुमार अक्षय वहाळकर या विद्यार्थ्याने पोस्टर मेकिंग स्पर्धेत रजत पदक, रांगोळी स्पर्धेत कास्य पदक आणि कोलाज या स्पर्धेत सुवर्णपदक वैयक्तिक पातळीवर प्राप्त केले. याबरोबरच महाविद्यालयाने यावर्षी इन्स्टॉलेशन या कलाप्रकारात प्रथमच सहभाग नोंदवला होता, ज्यात अक्षय वाहाळकर, सुदेश सुतार, वैष्णवी गीते, सिमरन कांबळे या चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रप्त झाले. लोकनृत्य प्रकारात या वर्षी छत्तीसगड राज्याचा गुदुंबजा हे नृत्य महाविद्यालया कडून सादर करण्यात आले होते पारस शिगवण, श्रीयांक पेंढारी, आर्यन शिर्के, देवांग मसुरकर, सुदेश सुतार, मिहिर म्हात्रे, केतन शिंदे, संस्कार लोहर, अथर्व भेकरे, अतिश तांबे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता लोकनृत्य कला प्रकारात महविद्यायास रौप्य पदक प्रप्त झाले. सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत, अभिनंदन आणि कौतुक सोहळा महाविद्यालयात पार पडला.
या कार्यक्रमाला नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री मंगेश जी तांबे, व्हा-चेअरमन डॉ. दीपक विखारे, खजिनदार श्री. अतुल जी चितळे, ज्येष्ठ संचालक माजी चेअरमन श्री. प्रकाश जोशी, डॉ. एम. एस. बापट सर, प्राचार्य डी. बी. जे. महाविद्यालय चिपळूण, उपप्राचार्य डॉ. आर. एम. मोरे व डॉ. चेतन आठवले, आय क्यू ए सी प्रमुख प्रा. उदय बामणे, रजिस्ट्रार श्री. अनिल कलकुटकी, सल्लागार प्रा. राज दवणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राहुल पवार, उपप्रमुख प्रा. प्राजक्ता पिसे, तसेच सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य उपस्थित होते. नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. मंगेश जी तांबे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस बापट यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभागाचे सदस्य प्रा . प्रशांत चव्हाण, प्रा तेजल गुरव, प्रा मुग्धा पाध्ये, प्रा. अस्मिता जोशी, प्रा. शिल्पा भिडे, प्रा. दर्शना संसारे, प्रा. सिद्धेश फके, प्रा. ओंकार देशमुख, प्रा. प्रांजल लकेश्री, प्रा. सर्वेश कुंदरगी प्रा. अतुफर नाईक, प्रा पायल गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रा. श्वेता चितळे, श्री. वैभव सतरंगे सर, श्री. महेश गुरव, श्री. नितीन सावले, श्री. भावेश के, श्री. विलास रहाटे, श्री. रुपेश धाडवे, श्री. गौरव बंडबे व श्री. श्रीराम सोमासे यांंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.