
डिजीटल दबाव वृत्त
जळगावच्या चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माजी माजी नगरसेवकावर अज्ञात पाच हल्लेखोरांनी गोळीबार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले आहे.
ही घटना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची गंभीर दखल घेत चाळीसगाव पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. अशातच या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे
जाहिरात


जाहिरात


