ठाणे ग्रँड सेंट्रल पार्कचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरूवारी होणार लोकार्पण

Spread the love

ठाणेकरांना मिळणार २०.५ एकर जागेतील सर्वात मोठे उद्यान

ठाणे : निलेश घाग मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सर्वात मोठ्या सेंट्रल पार्कचे लोकार्पण गुरूवार, ०८ फेब्रुवारी रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कोलशेत येथे कल्पतरू पार्कसिटीमध्ये सुमारे २०.५ एकरवर तयार करण्यात आलेले ग्रँड सेंट्रल पार्क मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते बुधवारी ठाणेकरांसाठी खुले करण्यात येणार आहे. या उद्यानात सुमारे ३५०० विविध प्रकारची झाडे आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी हे उद्यान आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. त्यात, मुघल, चिनी, मोरोक्कन आणि जपानी अशा चार पद्धतीचे संकल्पनेवर आधारित उद्यानेही आहेत. मुलांसाठी खेळायला भरपूर जागा, जॉगींग ट्रॅक, सर्वात मोठे स्केटींग यार्ड, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट या सुविधाही या उद्यानात आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी दिली. याच परिसरात मोठे अॅम्पी थिएटर, कॅफेटेरीया, प्रसाधनगृहे यांची व्यवस्था आहे. शाळांच्या सहली, पर्यावरणविषयक सहलींचे आयोजन करण्यासाठी या उद्यानाचा उपयोग करता येणार आहे. आयोजित करता येऊ शकतील. या उद्यानाच्या जागेतील पूर्वीची झाडे जतन करण्यात आली असून नवीन वृक्षारोपणही करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेने सुविधा भूखंड विकास प्रकल्पांअंतर्गत हे उद्यान विकसित करून घेतले आहे. सोमवारी पत्रकारांसाठी या उदयानाच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, माजी नगरसेवक संजय भौईर, उपायुक्त (उद्यान) मिताली संचेती आदी उपस्थित होते. *ग्रॅण्ड सेंट्रल पार्कची वैशिष्टये*

  • २०.५ एकरवर पार्कवरील ठाण्यातील सर्वात मोठे उद्यान
  • उद्यानात पक्षी आणि फुलपाखरांच्या १०० पेक्षा जास्ती जातींचा अधिवास.
  • ३५०० पेक्षा जास्त झाडे
  • न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हायड पार्क आणि शिकागोच्या लिंकन पार्कपासून प्रेरणा
  • चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा
  • मोरोक्कन, चिनी, जपानी आणि मुघल रचनांनी प्रेरित संकल्पना उद्याने
  • सर्वात मोठी खुली आणि हरित जागा
  • सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध मनोरंजनाच्या संधी
  • एक ट्रीहाऊस, तीन एकरांचा विस्तीर्ण तलाव, स्केटिंग पार्क यांचा समावेश

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page