भारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन सावंतवाडी येथे संपन्न!..

Spread the love

पंतप्रधान सन्माननीय श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी व नवभारत निर्माणासाठी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी भारतीय जनता पार्टीचे बूथ कार्यकारिणी महासंमेलन आयोजित करण्यात आले होते.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांचे हे महासंमेलन ०३ मार्चला सावंतवाडीतील राणी पार्वती देवी (RPD) हायस्कूलमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री तसेच रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांचे क्लस्टर प्रमुख सन्माननीय श्री प्रमोदजी सावंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार तथा कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख श्री.निलेशजी राणे साहेब, माजी आमदार श्री.प्रमोदजी जठार साहेब,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.अतुलजी काळसेकर साहेब,संघटन मंत्री श्री.शैलेंद्रजी दळवी साहेब, सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार श्री.राजनजी तेली साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकरजी सावंत साहेब, महिला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेताताई कोरगावकर, प्रदेश सदस्य श्री.बंड्या सावंत, सोशल मीडिया जिल्हा संयोजक श्री.श्रीकृष्ण परब,युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.लखमराजे भोसले, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब,सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री.मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस श्री.महेश सारंग, जिल्हा सरचिटणीस श्री.रणजित देसाई, प्रदेश सदस्या सौ.प्रज्ञा ढवण, जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, श्री.बाळासाहेब पाटील, माजी महिला जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे, कणकवली विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.मनोज रावराणे, सावंतवाडी शहर सरचिटणीस श्री.परिक्षित मांजरेकर, माजी नगरसेवक श्री. आनंद नेवगी, जिल्हा कार्यालय प्रमुख श्री.समर्थ राणे, मीडिया प्रमुख श्री.केतन आजगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच यावेळी सावंतवाडी विधानसभेमधील सर्व जिल्हा कार्यकारणी प्रमुख पदाधिकारी ,सर्व मंडल अध्यक्ष, मंडल कार्यकारणी प्रमुख पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, माजी जि.प. सदस्य, माजी प.समिती सदस्य तसेच सर्व मोर्चांचे पदाधिकारी, सुपरवारियर्स, शक्ती केंद्र प्रमुख,सर्व आघाडी आणि प्रकोष्ट पूर्ण वेळ उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page