दबाव वृत्त: ठाणे महापालिकेवर प्रशासक असल्याने महापालिका थेट राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहे.असे असले तरी दिवा शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी भाजप-शिवसेना(शिंदे गट) अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.दिव्यातील प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सोडविण्या ऐवजी भाजपचे पदाधिकारी मात्र आंदोलने करून नौटंकी करत असल्याचे मत आता नागरिक व्यक्त करत आहेत.
राज्यात सेना भाजपची सत्ता आहे.ठाण्यात भाजपचे दोन आमदार आहेत.ठाणे जिल्ह्यात भाजपचे मंत्री आहेत तर खुद्द मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत.असे असले तरी दिव्यातील प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सोडविण्या ऐवजी दिवा भाजपचे पदाधिकारी आंदोलने करण्यात धन्यता मानत असल्याने जनतेमध्ये भाजप पदाधिकारी यांच्या विरोधात नाराजी आहे. मागील काही दिवसांपूर्वी दिवा भाजपने तलावाचे आंदोलन केले तर आता नुकतेच गणेश नगर तलाव संदर्भात प्रश्न उपस्थित केले मात्र स्वतः राज्यात सत्तेत असताना हे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप प्रयत्न करत नसल्याने दिव्यातील भाजपला केवळ राजकारण करायचे आहे का? असा प्रश्न आता दिव्यातील नागरीक करीत आहेत. दिव्यातील भाजप नेत्यांनी आंदोलने करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गट राज्यात तसेच केंद्रात भाजप सोबत सत्तेत आहे. मग घोड कूठे अडलय………दिव्यातील प्रश्न सोडविण्या ऐवजी केवळ आंदोलनाचा दिखावा राजकारण करण्यासाठी करू नये. शासनाच्या माध्यमातून दिव्यातील प्रश्न भाजपने सोडवावेत अशी जनतेची भावना आहे.
- श्री. अनिल नलावडे :- दिवेकर
जाहिरात