रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील जाकिमिऱ्या येथील बूथ क्र. १५२ मध्ये आज बुथप्रमुख हेमंत माने यांच्या नेतृत्वाखाली व लोकसभा सहप्रभारी बाळ माने यांच्या उपस्थितीत घर चलो गाव चलो अभियानाची सुरवात करण्यात आली. ग्रामदेवता श्री नवलाईच्या मंदिरात देवीला प्रार्थना करून पत्रक ठेवण्यात आले. फिर एकबार मोदी सरकार असे सांगत रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार कमळाच्या चिन्हाचा निवडून यावा, अशी प्रार्थना केली.
लोकसभा सहप्रभारी बाळ माने यांनी गेल्या दोन महिन्यांत चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी व लांजा-राजापूर या विधानसभा क्षेत्रात गाव चलो अभियान राबवले. लोकसभा निवडणूक जाहिर झाल्यानंतरही घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे. आज त्यांनी जाकिमिऱ्या येथे मानकरी सुदेश सावंत, विनायक सावंत यांच्या घरी पत्रक देऊन मोदी सरकारला आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती केली. तसेच मोदी सरकारच्या १० वर्षांच्या उज्ज्वल कारकिर्दीची माहिती दिली. या वेळी बूथमधील कार्यकर्ते रवींद्र सावंत, रत्नागिरी उत्तर मंडलाचे सरचिटणीस बापू गवाणकर, हेमंत सावंत, नितीन भाटकर, हर्षल साळवी आदी उपस्थित होते.
या अभियानात महाराष्ट्राचे दिवंगत कृषीमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक, आरोग्य, नागरी पुरवठा मंत्री पर्शुराम कृष्णाजी तथा बाळासाहेब सावंत यांच्या निवासस्थानाला भेट दिली. जाकिमिऱ्या मराठवाडी, वरचीवाडी येथे हे घर असून तेथे त्यांचे तैलचित्र आहे. तसेच स्मृतीशिल्प आहे. त्यांच्या प्रतिमेला नमस्कार केला. त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. मोदी सरकार पुन्हा यावे याकरिता सावंत कुटुंबियांकडून आशीर्वाद घेतले. या वेळी हेमंत माने, रवी सावंत, रवीकांत सावंत, ग्रामपंचायत सदस्य नितीन सावंत, हर्षल साळवी, बूथमधील मनोज साळवी, हेमंत सावंत, मिऱ्या सोसायटी संचालक विक्रांत भाटकर, भाजपाचे उत्तर रत्नागिरी मंडलाचे सरचिटणीस बापू गवाणकर आदी उपस्थित होते.