चेन्नईत ऋतुचा ‘राज’; गुजरात विरुद्ध चेन्नईची विजयी हॅट्रीक, हंगामातील दुसरा विजय…

Spread the love

आयपीएल 2024 हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) नं चमकदार कामगिरी करत सलग दुसरा सामना जिंकला. चेपॉक स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सचा 63 धावांनी पराभव केला.

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या सातव्या सामन्यात पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) चमकदार कामगिरी केलीय. पहिल्यांदाच रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली आलेल्या चेन्नई संघानं सलग दुसरा सामना जिंकलाय. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईनं गुजरात टायटन्सचा (GT) 63 धावांनी पराभव केला. या सामन्यात गुजरात संघाचा कर्णधार शुभमन गिलकडे आयपीएल 2023 मधील पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी होती. परंतु तो तसं करु शकला नाही. आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नईच्या टीमनं गुजरातचा 5 गडी राखून पराभव करुन विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर आता दोन्ही संघ आमनेसामने आले होते.

गुजरातचे फलंदाज अपयशी…

दुबे आणि रवींद्रची आक्रमक खेळी….

या सामन्यात चेन्नई संघानं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत 207 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 8 गडी गमावून केवळ 143 धावाच करु शकला आणि त्यांना सामना गमाववा लागाल. गुजरातकडून साई सुदर्शननं सर्वाधिक 37 धावा केल्या. तर वृद्धिमान साहा आणि डेव्हिड मिलर प्रत्येकी 21 धावा करुन बाद झाले. गुजरातचा एकही फलंदाज आपली छाप सोडू शकला नाही परिणामी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई संघाकडून दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे यांनी 2-2 बळी घेतले. तर मिथिशा पाथिराना आणि डॅरेल मिशेलनंही 1-1 विकेट घेतली.

तत्पुर्वी नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघानं 6 गडी गमावून 206 धावा केल्या. शिवम दुबेनं संघाकडून 23 चेंडूत सर्वाधिक 51 धावा केल्या. या खेळीत त्यानं 5 षटकार आणि 2 चौकार मारले. त्याच्याशिवाय रचिन रवींद्रनं 20 चेंडूत 46 धावा करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली नाही. मात्र रशीद खानच्या चेंडूवर रचिन रवींद्र यष्टीचीत झाला. कर्णधार ऋतुराज गायकवाड 46 धावा करुन स्पेन्सर जॉन्सनच्या चेंडूवर झेलबाद झाला. दुसरीकडं गुजरात संघाकडून फिरकीपटू राशिद खाननं 2 बळी घेतले. साई किशोर, मोहित शर्मा आणि स्पेन्सर जॉन्सन यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.

चेन्नईची विजयाची हॅट्रीक…

गुजरात संघानं 2022 च्या हंगामात आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावलं होतं. तर दुसऱ्या सत्रात म्हणजेच 2023 मध्ये गुजरातला चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 6 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात दोन्ही संघांनी 3-3 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये प्रवेश केल्यानंतर गुजरात संघानं पहिल्या 3 सामन्यात चेन्नई संघाचा पराभव केला होता. पण महेंद्रसिंग धोनीच्या या चेन्नई संघानं दमदार पुनरागमन केलं. पहिले 3 सामने गमावल्यानंतर सलग 3 सामन्यात त्यांनी गुजरातचा पराभव केला आहे. अशाप्रकारे हा सामना जिंकून चेन्नई संघानं गुजरातविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केलीय.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page