कमळ चिन्ह आणि त्याखाली ‘पुन्हा एकदा, मोदी सरकार’, ‘अब की बार ४०० पार’ अशा आशयाची घोषवाक्ये लिहून मतदारांना आकर्षित करण्याचा केला प्रयत्न.

पावस | मार्च ०१, २०२४.
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मागील दीड वर्षापासून निवडणुकांच्या तयारीत आहेत. यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत चुरस वाढणार असल्याची चिन्हे दिसत असली तरी भाजपा कार्यकर्ते संपूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरल्याचे पहावयास मिळत आहे. एकीकडे मंत्री, मा. आमदार, निवडणूक प्रमुख, जिल्हाध्यक्ष वेगवेगळ्या आघाड्यांवर स्वतः काम करून कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहेत तर अनेक युवा कार्यकर्ते सोशल मिडिया, युवा भेटी घेत भाजपाचा प्रसार करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहेत.
पावस जि. प. गटातील गावखडी येते ग्रामस्थांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांनी गावातील भिंतींवर कमळ रंगवले. सोबतच मोदी सरकार पुन्हा एकदा निवडून येत असल्याची बोधवाक्ये लिहून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बंडूशेठ दाते, सुशांत (आप्पा) तोडणकर, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष जगन्नाथ पवार, तालुका चिटणीस संजय पाथरे, बूथप्रमुख प्रकाश गुरव, संतोष रेगे, सुमित तोडणकर, वैभव मेस्त्री, राजूदादा चव्हाण आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
याबाबत बोलताना श्री. सुशांत पाटकर म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे नेते स्वतः पुढाकार घेऊन आदर्श प्रस्थापित करतात. आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या या आदर्शांवर चालून तसे काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आमच्या या प्रयत्नांना विविध ठिकाणी ग्रामस्थ उत्स्फूर्त सहकार्य करत आहेत. याचे श्रेय निश्चितच महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोकण भाजपाचे नेते मा. ना. रविंद्रजी चव्हाण साहेब, रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा सह-प्रभारी मा. बाळासाहेब माने, रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्ष मा. राजेशजी सावंत, तालुकाध्यक्ष संयोग (दादा) दळी या सर्वांचे आहे.”