जिल्ह्यातील 1235 कोटींच्या तर, सिंधुदूर्गमधील 1921 कोटींच्या कामांना मंजुरी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला भूमिपुजन व उद्घाटन सोहळा रेल्वे स्टेशन 9सुशोभिकरण, रस्ते, विश्रामगृह, काँक्रीटीकरण, पुलांच्या कामांचा समावेश…

Spread the love

रत्नागिरी, दि.१ मार्च 2024 : रत्नागिरी जिल्ह्यातील 1235 कोटींच्या कामांना तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 1921 कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार गतिमान आहे, हे विकासकामांतून दिसत आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहातील भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वैश्वरैय्या सभागृहात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन भुमिपूजन व उद्घाटन सोहळा करण्यात आला. याप्रसंगी आमदार शेखर निकम हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. माजी आमदार बाळ माने, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार विनय नातू, सिंधुरत्न चे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, अधीक्षक्‍ अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, राजेश सावंत आदी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, कोकणातील विकास कामांचा अनुशेष भरुन काढण्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मला संधी मिळाली. ती सर्व कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. लोकप्रतिनिधीनी सूचवलेली सर्व कामे करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. त्यांच्या मतदार संघात हॅममधून 1768 कोटींची कामे करण्यात येणार आहेत. कोकण आणि पर्यटन यांच्या सहसंबध आहे, त्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून झाले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विकसित भारत आपल्याला पहायचा आहे, असे सांगत आहेत. त्यादिशेने आपल्या सर्वांना पाऊले उचलायची आहेत. विकास कामांमध्ये धिरंगाई होणार नाही, याची जबाबदारी अधिकारी निश्चित घेतील. जिल्या्यतील खेड, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी अशा रेल्वेस्टेशनच्या सुशोभिकरण कामासही सुरुवात झाली आहे. विमानतळावरील सुविधांप्रमाणे प्रवाशांना सुशोभिकरणतून सुविधा मिळणार आहेत. जुनच्या बजेटमध्ये 37 रेल्वेस्टेशनचे सुशोभिकरण होणार आहे.

यावेळी किरण सामंत, माजी आमदार श्री. माने यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी आमदार श्री. जठार यांनी आभार प्रदर्शन केले.

🔹️ऑनलाईन उद्घाटन समारंभ

▪️जयगड निवळी रस्ता रामा-९६४ किमी ०/०० ते ४२/३४० मध्ये मजबुतीकरण डांबरीकरण करणे, ता. जि. रत्नागिरी

▪️तळेकांटे तुळसणी देवरूख मार्लेश्वर रस्ता रा. मा. १७४ मार्लेश्वर शाखा कि. मी. 0/00 ते ४/४०० मध्ये डांबरीकरण करणे. ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी
निवेंडी पातेवाडी रस्ता वारपाटवाडी शाखेसह ग्रामा ६२ (निवेंडी भावकाई मंदिर) येथे लहान पूलाचे बांधकाम करणे. ता. जि. रत्नागिरी

▪️तिवराड वेतोशी कोतवडे रस्ता किमी १९/८२० मध्ये नेवरे नदीवर मोठ्या पूलाचे बांधकाम करणे. ता. जि. रत्नागिरी

▪️तिवराड वेतोशी कोतवडे ते प्र.जि.मा. ५५ ला मिळणारा रस्ता आरे बसणी शाखेसह प्र.जि.मा. ५८ किमी. १२ / ००ते १२/६०० मध्ये चढसुधारणा करणे, तसेच किमी १२/७६० मधील कोतवडे पुलाचे जोडरस्ता व संरक्षक उपाययोजना करणे. ता. जि. रत्नागिरी

▪️केळवली जवळेतर रस्ता प्रजिमा-७३ किमी ०/०० ते १०/०० मध्ये रस्त्याचे रूंदीकरण करणे. ता. राजापूर जि. रत्नागिरी

🔹️ऑनलाईन भुमिपूजन कार्यक्रम

▪️राजापूर शासकीय विश्रामगृह नविन इमारत बांधकाम करणे. ता. राजापूर जि. रत्नागिरी

▪️लांजा शासकीय विश्रामगृह नविन इमारत बांधकाम करणे. ता. लांजा जि. रत्नागिरी

▪️साखरपा शासकीय विश्रामगृह नविन इमारत बांधकाम करणे. ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी
चिपळूण शासकीय विश्रामगृह नविन इमारत बांधकाम करणे. ता. चिपळूण जि. रत्नागिरी

▪️सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण कार्यालयीन नविन इमारतीचे बांधकाम करणे. ता. चिपळूण जि. रत्नागिरी
तिवराड वेतोशी कोतवडे प्र.जि.मा.५८ किमी. ३/६०० मधील मौजे वाडाजून येथील सोमेश्वर मंदिर येथे लहान पुलाचे बांधकाम करणे.

▪️खेरशेत कोकरे नायशी पेढांबे माखजन रस्ता प्र.जि.मा.३८ कि.मी. ८/०० ते १३/७०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे. ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी

▪️प्र. रा. मा. क्र. ४ ते गोळप गावातुन जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे. ग्रा.मा.क्र. ३२. ता. जि. रत्नागिरी

▪️पाटगांव बौध्दवाडी कुंभारवाडी ते साबमंदिर रस्ता ग्रामा २६४ कि.मी.१/०० मध्ये लहान पूलाचे बांधकाम करणे. ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी

▪️रत्नागिरी कुवारबांव हरचेरी देवधे रस्ता रा.मा. १६५ किमी.०/०० ते २/०० मध्ये रस्त्याचे रुंदीकरण करणे. ता. जि. रत्नागिरी

▪️कोळंबे शाळा क्र. १ ते मधला वठार मांडवकरवाडी ग्रामा १९० कि.मी. ० / २०० मध्ये मोठ्या पूलाचे बांधकाम करणे. ता. जि. रत्नागिरी

▪️देवरुख मातृमंदिर विप्रवली ओझरे कळंबस्ते रस्ता प्रजिमा ४९ कि.मी. ०/०० ते ५/०० मध्ये सुधारणा करणे. ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी

▪️तुरळ कडवई चिखली तांबेडी आंत्रवली कळंबस्ते रस्ता चिखली शाखेसह प्र.जि.मा. ४६ कि.मी. ०/०० ते ५/५०० व ०/०० ते ३/५०० (मासरंग शाखेसह) सुधारणा व डांबरीकरण करणे व कि.मी. ४/६०० मधील पुलाला केसिंग करणे. ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी

▪️विठापेठ मलकापूर अणुस्कुरा रस्ता रामा- १५० किमी. १३७/०० ते १५२/०० व किमी. १५९/६०० ते १६५ / ६००
मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता. राजापूर जि. रत्नागिरी

▪️तेरवण थोरवलीवाडी बाईगवाडी बौध्दवाडी कोतापूर रस्ता ग्रामा १२१ किमी ३/०० मध्ये लहान पूलाचे बांधकाम करणे. ता. राजापूर जि. रत्नागिरी

▪️प्रजिमा-७४ ते चौके लावगणवाडी तारळ बौध्दवाडी रस्ता ग्रामा-४१५ किमी ३/३७० मध्ये मोठ्या पूलाचे बांधकाम करणे. ता. राजापूर जि. रत्नागिरी

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page