रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानक या ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे या परिसरामध्ये पार्किंगसाठी असलेली सुविधा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पोलीस विभागाकडून होणारी कारवाई सद्यस्थितीतचा विचार करता स्थगीत करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे. रेल्वे स्थानक परिसरामध्ये येणाऱ्या नागरिकांचे सतत तक्रार होती की येथे आरटीओ कार्यालयाकडून होणारी कारवाई शिथिल करावी. भारतीय जनता पार्टीने या विषयाकडे गांभीर्याने पाहिल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरामध्ये येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह दादा दळी, सुशांत पाटकर, उमेश देसाई, मंदार खंडकर राजेश पाथरे, वैभव पोतकर आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.