दोन पेक्षा जास्त मुले असणाऱ्या मुस्लिम कुटुंबाला…:लाडकी बहीण योजनेतून वगळा, भाजप आमदार नीतेश राणे यांची मागणी…

Spread the love

सिंधुदुर्ग- मुस्लिम कुटुंबात जर दोन पेक्षा जास्त मुले असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, असे विधान भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले. मतदान करताना यांना मोदी नको असतात, हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार नको असते. मात्र, प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ जास्त प्रमाणात घेणारे मुस्लिम कुटुंब असतात. मग तुम्ही लाभ कशाला घेता?, असेही नीतेश राणे म्हणाले.

बांगलादेशात हिंदू व बौद्ध समाजातील नागरिकांवर हल्ल्याच्या व अत्याचाराच्या घटना वाढल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग येथे मूक मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, ओरोस सिंधुदुर्गनगरी ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत का मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना संबोधिक करताना नीतेश राणे यांनी उपरोक्त व्यक्तव्य केले.

काय म्हणाले नीतेश राणे?…

हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात हिंदू न्याय यात्रा आज निघाली होती. आमच्या सिंधुदुर्गात आमच्या हिंदू समाजाने बांगलादेशात असलेल्या हिंदू माता-भगिनी आणि बंधूंसाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी मोर्चा काढला होता. बांगलादेशातले हिंदू एकटे नाहीत हे सांगण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढल्याचे नीतेश राणे म्हणाले. महाराष्ट्रातला हिंदू समाज बांगलादेशातील हिंदूंसोबत आहे. त्यांच्यावर होणारे अत्याचार आम्ही पाहतो आहोत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही हिंदूवर अत्याचार होऊ देणार नाही, असा आम्हाला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच आम्ही न्याय यात्रा काढली होती, असे नीतेश राणे म्हणाले.

तुम्हाला मोदी नको, मग लाभ कशाला घेता?…

मुस्लिम कुटुंबात दोन अपत्यांपेक्षा जास्त अपत्य असतील, तर त्या कुटुंबाला लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, अशी आमची मागणी असल्याचे नीतेश राणे म्हणाले. कारण मतदान करताना यांना मोदी नको असतात, हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार नको असते. मात्र प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ जास्त प्रमाणात घेणारे मुस्लिम कुटुंब असतात. मग तुम्ही लाभ कशाला घेता? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या यादीत जास्तीत जास्त मुस्लिम असल्याचा दावा नीतेश राणे यांनी केला. आदिवासी समाज वगळून ज्यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असतील त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळावे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार असल्याचे नीतेश राणे म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page